Gambling : पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक करत पत्याचा कल्ब सुरूच

अवैध्य प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीसांना माहिती द्या

पुणे : पुणे शहरातील अवैध्य धंदे हद्दपार करून पुण्यात लाखो गोरगरीब जनतेची लुटमार बंद करत पुणे शहराचे आयुक्त साहेब यांनी अवैध्य धंदेवाईकांना तंबी दिलेली आहे तर आयुक्त साहेब यांच्या आदेशाचे पालन करत स्थानिक पोलीसही अवैध्य उद्योग चालणार नाही याची खबरदारी चोख पणे घेत आहेत तरीही वर्षोनीवर्ष अवैध्य उद्योग चालविणारे गप्प बसतीलच असे नाही.

बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील स्टेशन रोड, रेल्वे काॅलनी येथे पत्र्याच्या खोली मध्ये कुंभार नावाच्या नामचीन मटका, कल्ब चालविणाऱ्या व्यक्तीने आपल्या काही साथीदारांसह पत्याचा कल्ब सुरू केला आहे. या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांनाही माहिती देण्यात आलेली असुन भविष्यात सदरचे अवैध्य उद्योग चालणार नाही असा सामान्य जनतेला विश्वास आहे.

वेळेनुसार कल्बच्या पत्ता होतो बदल;

आज रेल्वे काॅलनी येथे सुरू असलेला पत्याचा कल्ब वेळेनुसार पत्ता बदलुन कधी केएम हाॅस्पिटल शेजारील गल्लीत पहिल्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये सुरू असतो सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आजुबाजुला दिसल्यास बाहेर उभे असलेले कल्बचे साथीदार त्यांना घेरतात व्हिडिओ, फोटो काढून देत नाहीत मंडळाचे कार्यकर्ते बसल्याचे सांगितले जाते तर मोठी – मोठी ओळख सांगुन दमदाटी केली जाते.

आजु बाजुला रहाते घरे असल्यामुळे थेट प्रवेश करणेही शक्य होत नाही त्याचाच गैर फायदा घेत चोरून परंतू सर्रासच पत्याचे कल्ब सुरू आहेत असे काही गैरप्रकार आपल्याही निदर्शनास आल्यास पुणे शहर पोलीस आयुक्त साहेब यांना अपेक्षित असलेले पुणे शहर अवैध्य धंदे मुक्त करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, जर आपल्या निदर्शनास अवैध्य प्रकार आल्यास तात्काळ आपल्या स्थानिक पोलीसांना सदर माहिती द्यावी व आपले समाजाप्रतीचे योगदान द्यावे.

Exit mobile version