Gambling : पुण्याच्या खेळीची शिंदेवाडीत मांदियाळी; गाड्या भरभरून जुगारी साताऱ्याच्या वाटेवर ?

पुणे, निर्भीड वर्तमान:- पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपला पदभार स्वीकारला व त्याच रात्री शहरातील अवैध्य धंद्याचे शटर बंद झाले व जुगार चालक- मालक, खेळी यांचे धाबे दणाणले. परंतु जुगार खेळणारे व खेळविणारे गप्प बसले असे घडले तर सुर्य पश्चिमेकडून उगवला असे म्हणावे लागेल !

तुम्ही म्हणाल असे का ? सांगण्याचे कारणही तसेच आहे एकिकडे पुणे शहर आयुक्त यांनी अवैध्य धंद्याना थारा नसल्याचे स्पष्ट केले तर सोबतच पुणे ग्रामीणचे अधीक्षकांनी सारखाच अजेंडा ठेवल्याने पुणे शहरातील जुगार मालक- चालक व खेळी यांची भलतीच गोची झाली होती.

यावर रामबाण उपाय म्हणजे पुणे शहर व ग्रामीण हद्द सोडून धंदे सुरू करायचे त्याच पार्श्वभूमीवर सुत्रांकडुन मिळालेल्या बातमीनुसार वाईजवळील पसरणी घाटात एका मोठ्या बंगल्यामध्ये जुगाराची जत्रा सुरू होती परंतू हे अंतर पुण्यातुन साधारणतः 70 ते 80 किमी आहे. याला पर्याय व फायदा म्हणून पुण्यातील नामचीन पत्याच्या क्लबचे मालक ज्यांवर यापूर्वीही पुण्यात अवैध्य जुगार चालविल्या बद्दल अनेकवेळा कारवाई झालेले मालक यांनी जुगार खेळणाऱ्या पुणेकरांच्या सोईसाठी शिरवळची नदी पार केल्याबरोबर असलेल्या शिंदेवाडी येथे भोर रस्याला लायसन्सचे कल्ब सुरू केल्याची खात्रीशीर माहिती आहे.

या कल्बला लायसन्स कसे आहे ? तर येथे सुरूवातीला दाखवण्यासाठी एक फाॅर्म भरून घेतला जातो. नाव, गाव मोबाईल क्रमांक वैगेरे ( एकदम Profesional feeling खेळींना व सामान्य नागरिकांच्या भावणेसाठी ) तर पैसे टेबलावर ठेवले जात नाहीत तर पैश्याच्या बदल्यात काॅईन दिले आणी जो खेळ खेळायचा तोच खेळला जातो. सामान्य नागरिकांकडून तक्रार आल्यास लायसन्स असल्याचे भासवले जाते. पण मग प्रश्न हा आहे की अनेकवेळा जुगार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हे दाखल खेळी, मालक – चालक साताऱ्यात गोटी – गोटी खेळायला जातात काय ? असे म्हणणे एक मोठा विनोदच होईल.

असो लवकरच पैश्याच्या बदल्या काॅईन देणे- घेण्याचे पुरावे सहित, लोकेशन, मालक-चालक ईतर महत्त्वपुर्ण माहिती आपण पुढील भागात घेऊन आणण्याचा प्रयत्न करूच तो पर्यंत सातारा पोलीस अधिक्षक यांनी सदर गंभीर प्रकरणाची सखोल माहिती घेऊन अवैध्य जुगाराला थारा देवू नये अशी सामान्य नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुढील घडामोडी जाणुन घेण्यासाठी वाचत रहा निर्भीड वर्तमान.

Exit mobile version