fake kidnapping ; स्वतःच्या अपहरणाचा केला बनाव; पोलिसांनी एका तासात उधळून लावला डाव

पुणे, निर्भीड वर्तमान:- ऑनलाईन लोनचे घेतलेले पैसे परत करण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा fake kidnapping बनाव करून आपल्या घरातून पैसे मिळवण्यासाठी खंडणी मागण्याचा डाव पोलिसांनी घेतले एका तासात उधळून लावला आहे.

नियंत्रण कक्ष पिंपरी चिंचवड येथे कॉल प्राप्त झाला होता की, विराज देशपांडे वय २७ वर्षे यास दिघी परिसरातुन तीन अज्ञात व्यक्तिंनी किडनॅप करुन पळवून नेले असुन पाच लाख रुपये खंडणी मागत आहे. आणी पैसे न दिल्यास जिवे ठाणे मारण्याची धमकी दिली आहे. अशी माहिती मिळताच दिघी पोलीस ठाणे तपास पथक व गुन्हे शाखा युनिट ०३ हे तात्काळ अपहरण झालेल्या विराज देशपांडे तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते.

fake kidnapping

त्यानंतर कॉल केलेल्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विष्लेशन करुन पोउपनि भदाणे व सपोनि अंभोरे तसेच तपास पथकाला विराज देशपांडे हा खराडी पुणे येथे मिळुन आला त्याचा कडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवाडवीची उत्तरे दिली. तसेच त्याला कोठुन fake kidnapping किडनॅप केले अशी विचारले तर तो प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती देत त्यानंतर त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले कि “मी इन्टंट कॅश लोन या अॅपवरुन लोन घेतले तसेच लोन कंपणीचे लोक लोन साठी वारंवार फोन करुन लोनचे पैसे परत देण्यासाठी विचारणा करत होते परंतु त्यांचेकडे पैसे नसल्याने विराज देशपांडे व त्याचा मित्र राहुल कुमार हे विमाननगर येथे असताना त्यांनी घरच्यांकडुन लोनचे पैसे भरण्यासाठी खोटा कॉल करण्याचे ठरवले व विराज देशपांडे व राहुल कुमार यांनी पैशाची मागणी करण्यासाठी त्यांची बहिण वृंदा हिरळकर यांना फोन करुन त्याचे किडनॅपिंग झाले असुन पाच लाख रुपये मागणी करत असल्याचे सांगितले व पैसे न दिल्यास जिवे मारणार असल्याचे सांगितले होते” अशी माहिती दिली आहे.

fake kidnapping

अपहरण झालेला विराज विकास देशपांडे हा सुरक्षीत असुन त्याचे कोणत्याही प्रकारचे अपहरण झालेले नाही त्याने पोलीसांना खोटी माहिती दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, त्याचे विरूध्द दिघी पोलीस ठाणे याठिकाणी अदखलपात्र गु. रजि नं. १९३/२०२४ भा. द. वि कलम १८२ अन्वये तक्रार नोंद करण्यात आली असुन पुढील तपासाची मा. न्यायालयाची परवानगी घेण्यात आली असुन पुढील तपास चालू आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त साो, परीमंडळ ०३, श्री. शिवाजी पवार साो, मा. पोलीस उप-आयुक्त साो, गुन्हे शाखा श्री. संदिप डोईफोडे तसेच मा. सहा पोलीस आयुक्त साो चाकण विभाग, श्री. राजेंद्रसिह गौर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ०३ शैलेश गायकवाड व सहा. पोलीस निरीक्षक नितीन अंभोरे, प्रभारी निरीक्षक दिघी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०३ पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोशि नांगरे, पो.शि. जैनक दिघी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पो.हा. चिंतामण फलके, पो.हा.प्रदीप पोटे, पो.हा. किशोर कांबळे, पो.शि.उमेश कसबे यांनी केली आहे.

Exit mobile version