Employment fair : रावेत येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे, निर्भीड वर्तमान:- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग पुणे आणि आकांक्षा फौंडेशन स्किल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ५ जुलै रोजी सकाळी १० वाजता रावेत येथील आकांक्षा इंटरनॅशनल स्किल स्कूलमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून त्यांच्याकडून ३ हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. ही रिक्तपदे किमान १० वी, १२ वी, पदवीधर, कोणत्याही शाखेचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम (आयटीआय) पूर्ण केलेला, पदविकाधारक, शिकाऊ अभियंता (ट्रेनी इंजिनिअर) अशा विविध पात्रताधारक उमेदवारांतून भरण्यात येणार असून नोकरीइच्छुक उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावेत. रोजगार मेळाव्याच्या दिवशी थेट मुलाखतीस येताना आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी आकांक्षा इंटरनॅशनल स्किल स्कूल, बास्केट ब्रिज जवळ, वॉटर पंपींग स्टेशन, रावेत येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार रोड, पुणे-११ येथे प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

Exit mobile version