क्राइमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Drugs : मुंबई विमानतळावर 20 कोटी रुपयांचे कोकेनजप्त

मुंबई, निर्भीड वर्तमान:- नैरोबीहून मुंबईला आलेल्या आणि सिएरा लिओनचे नागरिकत्व असणाऱ्या एका महिला प्रवाशाला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर 19.79 कोटी रुपयांच्या कोकेनसह ताब्यात घेतले आहे.

या महिला प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता ती जवळ असलेल्या वस्तू उदा. बुट, मॉइश्चरायझरची बाटली, शॅम्पूची बाटली आणि अँटी-पर्स्पिरंट्स हे खुपच जड होते. महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासणीत या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या शिताफीने लपवलेली पांढरी पावडर आढळून आली. फील्ड टेस्ट किटचा वापर करून या पदार्थाची चाचणी केल्यावर त्यात कोकेन असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण 1979 ग्रॅम पांढऱ्या पावडरच्या रुपातील जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे बाजार मूल्य अंदाजे 19.79 कोटी आहे.

यावेळी या महिला प्रवाशाने आपला जबाब नोंदवल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!