BIS Raid : अन्न पदार्थांच्या वेष्टनासाठी (BIS standard) मानक चिन्हरहित अल्युमिनियम फॉइल विकणाऱ्या दुकानावर छापा

मुंबई, निर्भीड वर्तमान:- मुंबईतील चेंबूर भागातील एका दुकानात भारतीय मानक ब्युरोने (BIS)टाकलेल्या छाप्यादरम्यान, असे आढळून आले की या आस्थापनेत पदार्थांच्या वेष्टनासाठी बीआयएस मानक चिन्हरहित (Without BIS standard mark) ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियम मिश्र धातु बेअर फॉइल संचयित आणि विक्री केली जात आहे. चेंबूरमधील लोखंडे मार्गावर असलेल्या मेसर्स न्यू रायन प्लॅस्टिक या दुकानात या छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियम फॉइल आणि त्यापासून तयार पॅकेजिंग साहित्य सापडले आहे.

या गुन्ह्यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

सर्व ग्राहकांना बीआयएस प्रमाणित असलेल्या अनिवार्य उत्पादनांची यादी शोधण्यासाठी बीआयएस केअर ॲप (मोबाईल अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्याचे आवाहन केलेले आहे आणि ही उत्पादने खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावर आयएसआय मार्कची वास्तविकता तपासण्याची विनंती केली जात आहे. त्यासाठी भारतीय मानक ब्युरोच्या www.bis.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

भारतीय मानक ब्युरोने नागरिकांना वारंवार विनंती केली आहे की त्यांना बीआयएस प्रमाणपत्राशिवाय अनिवार्य उत्पादने विकली जात असल्याचे आढळल्यास किंवा कोणत्याही उत्पादनावर ISI मार्कचा गैरवापर होत असल्यास, त्यांनी BIS कार्यालयाला याची माहिती द्यावी. मुंबईत, अशा घटनांची तक्रार मुंबई शाखा कार्यालय-I चे मुख्य, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, भारतीय मानक ब्युरो, 5 वा मजला, CETTM कॉम्प्लेक्स, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई – 400076 या पत्त्यावर केली जाऊ  शकते.  hmubo1@bis.gov.in. या पत्त्यावर ई-मेल द्वारे देखील तक्रार दाखल करता येऊ शकते. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल, असे मुंबई शाखा कार्यालय-I येथील शास्त्रज्ञ- जी तसेच वरिष्ठ संचालक आणि प्रमुख सतीश कुमार यांनी सांगितले आहे.

Exit mobile version