BARTI : ‘महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

पुणे, निर्भीड वर्तमान:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ‘महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी विविध भाषेतील साहित्यकारांनी त्यांचे काव्यरूपातील साहित्य ३१ मे पर्यंत पाठविण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (BARTI) महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव ज्याप्रमाणे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रावर पडला तसाच तो साहित्य क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर पडला. प्रारंभिक काळात राज्यातील साहित्यिकांनी कविता, कथा, नाटक, आत्मचरित्र इत्यादी लेखन प्रकारातून विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली आहे. त्याचबरोबर इतर भाषिक राज्यातही विविध भाषा तसेच बोलीभाषे मध्ये देखील अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली आहे. हे विचार जनसामान्य माणसापर्यंत पोहचविण्यात कवी, गायक, शाहीर, साहित्यिक, कलावंतांचे मोठे योगदान आहे.

BARTI

या सर्वांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांनी लिहिलेल्या कविता, गझल, अभंग, अखंड, ओवी, छक्कड, शाहिरी, रुबाया, हायकू, चारोळी, भारुड, पोवाडा, लोकगीते इत्यादी सर्व काव्यप्रकार मोठ्या प्रमाणावर संकलन व एकत्रित करून ‘महामानव विश्वकाव्य दर्शन’ हा काव्यसंग्रह संपादित करून ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे प्रस्तावित आहे.

त्यासाठी साहित्यकारांनी विविध भाषेतील काव्य निर्माण केलेले असल्यास त्याची प्रत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (BARTI), २८ क्वीन्स गार्डन, पुणे ४११००१ या पत्यावर किंवा vishwakavyabarti@gmail.com या ई-मेलवर किंवा ९४०४९९९४५२ व्हॉट्सअॅप क्रमांकावर ३१ मे पर्यंत पाठवावी. या कविता साहित्यिकाच्या नावाने प्रसिद्ध करण्यात येईल. सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन बार्टीमार्फत करण्यात आले आहे.

Exit mobile version