Anti-Corruption Department; अवैध वाळु वनीकरण क्षेत्रातून वाहतूक करण्यासाठी मागितली १ लाख रुपयांची लाच

वनरक्षकला (forest guard) लाचलूपात प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले

पालघर दि ९. निर्भीड वर्तमान:- अवैध वाळु (illegal sand) वनीकरण क्षेत्रातून वाहतूक करण्यासाठी मागितली १ लाख रुपयांची लाच #bribe मागणाऱ्या वनरक्षकला लाचलूपात प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) रंगेहात पकडले आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे वनविभागाच्या हद्दीतील रस्त्याचा वापर करून त्यांच्या ट्रॅक्टरमधुन अवैधरित्या वाळू वाहतुक करीत असताना आरोपी भुषण आनंदा शेवरे, वय ३४ वर्षे, वनरक्षक (forest guard) कार्यालय किनिस्ता, परिमंडळ किनिस्ता, वनक्षेत्र खोडाळा, वनविभाग जव्हार, ता. मोखाडा जि.पालघर (वर्ग-३) यांनी त्याला पकडले होते त्याच्या अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कायदेशिररित्या गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि यापुढे भविष्यात अवैध वाळू वाहतुकीचा व्यवसाय वनविभागाच्या हद्यीतून सुरळीत चालू देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दिनांक २१/१२/२०२३ रोजी १,००,०००/- रूपयांची मागणी करून त्यापैकी ३०,०००/- रूपये हे त्याच दिवशी घेतले होते आणी उर्वरित लाचेची रक्कम आरोपी भुषण आनंदा शेवरे यांनी त्यांचे कार्यालयात घेवून येण्यास सांगितली, लाच देण्याची तक्रारदाराला मान्य नसल्यामुळे त्यांनी दिनांक ०१/०१/२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Department) पालघर कार्यालयाकडे तक्रार दिली.

https://nirbhidvartmaan.com/deputy-chief-minister-ajit-pawar/

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि.०२/०१/२०२४ रोजी पंचासमक्ष आरोपी भुषण आनंदा शेवरे यानं, ३०,०००/- रूपये स्विकारल्याचे मान्य करून तक्रारदार यांच्याकडे पुन्हा ३०,०००/- रू. लाचेची bribe मागणी करून ती दिनांक ०८/०१/२०२४ रोजी वनविभागाच्या परिमंडळ अधिकारी कार्यालय किनिस्ता, ता. मोखाडा येथे पंच साक्षीदार यांचेसमक्ष स्विकारली असता भुषण शेवरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पालघर कार्यालयाचे सापळा पथकाकडून रंगेहाथ पकडले आहे व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात आले की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रारअसल्यास (Anti-Corruption Department) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यांचेशी तात्काळ संपर्क करावा.

Exit mobile version