ताज्या घडामोडीपुणेराजकीयसामाजिक

रिपब्लिकन युवा सेनेचा झंझावात पुण्यात सुरू..!

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षांची झाली नियुक्ती.

पुणे : रिपब्लिकन पक्षाची झंझावात वात पुण्यात जोरदार सुरू आहे पुणे शहरातील सर्व रिक्त पदे समाजासाठी जागृत व धडाडीचे नेतृत्व करणारे आंबेडकर घरावर एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्ते यांची निवड रिपब्लिकन सेना अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सदस्य शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन युवा सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आली आहे.

रिपब्लिकन युवा सेना पुणे शहर अध्यक्ष पदी सचिन आहिरे,  पुणे शहर महासचिव पदी नितीन आडसुळ, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष पदी अलविन शेपट, पिंपरी-चिंचवड सचिव पदी शुभम गायकवाड तर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी इम्रान पटेल यांची नियुक्ती रिपब्लिकन युवा सेना महाराष्ट्र अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. 

या कार्यक्रमात रिपब्लिकन संघर्ष सेना महाराष्ट्र सदस्य शशिकांत कांबळे यांनी आपल्या सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, महाराष्ट्र भर व पुण्यातील प्रत्येक गावखेड्यापर्यंत रिपब्लिकन पक्ष कसा वाढेल यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रामाणिक काम केले पाहिजे समाजातील प्रत्येक घटकासाठी व अन्यायाविरुद्ध रिपब्लिकन सेना रस्यावर उतरून संविधानीक मार्गाने आंदोलन करणार असुन न्याय मिळवण्याच्या याची खात्री सह प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी यांच्या मागे ठाम पणे उभे असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.

रिपब्लिकन युवा महाराष्ट्र अध्यक्ष किरण घोंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असतांना सांगितले की मुंबई सारख्या शहरामध्ये आपले अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी मोठा लढा उभा करुन इंदुमिल येथे साडेबारा एकर जमीन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी समाजाला मिळवुन दिली आहे. एक स्वाभिमानी आणी खंबीर नेता आपणांस लाभलेला आहे. आपण त्याचे हात बळकट करण्यासाठी प्रामाणिक काम केले पाहिजेत व गाव तेथे शाखा झाली पाहिजे हि जबाबदारी आपण स्वतः उचलली पाहिजे असे सांगितले आहे.

या बैठकीत मोठ्यासंखेने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड चाकण राजगुरुनगर, श्रीरामपुर येथुन कार्यकर्ते उपस्थित झाले होते यामध्ये मुकुंद रणदिवे, राजू गायकवाड, उषा वाघमारे, रेखा टेंभुर्णी, नंदनी पवळे, आतिश बनसोडे, सदानंद गवई, रमेश कांबळे, नारायण मस्के, विशाल मानकर आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

सर्व वरिष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सोबत स्नेहभोजन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर सर्वांनी कार्यक्रमाचे आयोजक पुणे जिल्हा युवा अध्यक्ष सदानंद गवई व नवनिर्वाचित पुणे शहर अध्यक्ष सचिन आहिरे यांचे उत्तम नियोजन केल्या बद्दल आभार व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!