ताज्या घडामोडीपुणे

PUNE RTO : चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका सुरु; आवडता क्रमांक करा बुक !

पुणे, निर्भीड वर्तमान:- चारचाकी खासगी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन (PUNE RTO) पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

Pune RTO

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ९ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहणार आहे.

Pune RTO
Pune RTO

एकाच क्रमांका करिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) १० मे रोजी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. हा धनाकर्ष किमान ३०१ रुपयांपेक्षा जास्त तसेच (PUNE RTO) ‘आर.टी.ओ.पुणे’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृह परिवहन कार्यालय येथे उप प्रादेशिक अधिकारी व सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तिसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.

आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीच्या प्राधिकार पत्राचा नमुना कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पत्ता असलेल्या वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत, अशी (PUNE RTO) माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!