ताज्या घडामोडीपुणेसामाजिक

Pune Police; पुणे पोलिसांना ड्रग्स विरोधात कामगिरीबद्दल ₹25 लाखांचा पुरस्कार जाहीर

पुणे, निर्भीड वर्तमान:- पुणे शहर पोलिस Pune Police दलाने अंमली पदार्थ जप्तीच्या केलेल्या विक्रमी कामगिरीबद्दल पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Pune Police
Pune Police

पोलीसांचे कौतुक करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  ₹3700 कोटींचा एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत करण्याचे काम पुणे पोलिसांनी केले. राज्य शासन गेले काही महीने सातत्याने ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ मोहीम राबवत आहे. केंद्रीय गृहमंत्री मा.अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात देशात ‘ड्रग्स फ्री इंडिया‘ची मोहीम राबविली जात आहे.

Pune Police
Pune Police

अंमली पदार्थ तरुणाईला उध्वस्त करण्याचे काम करत आहेत. म्हणून याविरुद्ध एकत्रितपणे लढाई लढणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या गुन्हे परिषदेत ड्रग्स विरोधात ‘झीरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारण्याची केलेली सूचना सर्व पोलिस युनिट्सने गांभीर्याने घेतली याचा आनंद आहे.

Pune Police
Pune Police

या कारवाईने आपल्या सर्वांचे डोळे उघडले जावेत, एवढा साठा यावेळी जप्त करण्यात आला. हा साठा शेवटच्या उपभोक्त्यापर्यंत पोहोचला असता तर असंख्य घरे उद्ध्वस्त झाली असती. यावरून एमडीसारखे अंमली पदार्थ कारखाने सुरू करून एमडी बनवण्याचे काम असल्याचे दिसून येते. कुरीयर, डार्क नेटचा तसेच समाज माध्यमांचा वापर करून छोट्या छोट्या प्रमाणात यांच्या पुरवठ्याचा आकार असल्याने ते शोधून काढणे कठीण होते.

Pune Police
Pune Police

यामुळे ही एक कारवाई करून थांबता येणार नाही, यावरून अशा प्रकारचा छोटासा साठा जरी सापडला तरीही त्याचा पाठपुरावा करून त्याचे धागेदोरे शोधून काढणे गरजेचे आहे हे लक्षात येते. यावर सर्व पोलिस यूनिट चांगले काम करतील असा विश्वास आहे. या विक्रमी कारवाईबद्दल Pune Police पुणे पोलिसांना ₹25 लाखांचा पुरस्कार यावेळी जाहीर करण्यात आला आहे.

Pune Police
Pune Police

यावेळी खासदार मेधाताई कुलकर्णी व पुणे शहर पोलिस दलाचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!