ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

येवला मतदारसंघातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत निधीचे वितरण करा – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.१४  निर्भीड वर्तमान:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला मतदारसंघात नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या गारपीट अवकाळी नुकसान मदतीचा आढावा घेतला असून शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेली रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत निधीचे वितरण करावे – मंत्री छगन भुजबळ

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नोव्हेंबर २०२३ मध्ये येवला मतदारसंघातील निफाड तालुका परिसरातील गारपीटग्रस्त २५२७ बाधित शेतकऱ्यांना ४ कोटी १५ लाख ७० हजार रुपये तर येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.

येवला मतदारसंघातील निफाड तालुका परिसरातील विंचूर, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर व लासलगाव मंडळात तसेच येवला तालुक्यातील आंबेगाव, सोमठाण देश, निळखेडे व कातरणी परिसरात नोव्हेंबर २०२३ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. तसेच अधिक मदत मिळवून देण्याबाबत शेतकऱ्यांना आश्वासित केले होते.

त्यानुसार जिरायत, बागायत व फळपिकांच्या प्रती हेक्टरी निफाड तालुका परिसरातील विंचूर, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर व लासलगाव मंडळातील ५० गावांतील एकूण २५२७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  ४ कोटी १५ लाख ७० हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आली आहे.

तसेच येवला तालुक्यातील आंबेगाव, सोमठाण देश, निळखेडे व कातरणी येथील ३७७ नुकसानग्रस्त ७८ लक्ष ७७ हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!