ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रसामाजिक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

नवीन बसस्थानकाचे लवकरात लवकर उद्धघाटन करुन नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करा.

बारामती, दि.१४ निर्भीड वर्तमान:- बारामती शहरात विविध विकासकामे सुरु असून ती वेळेत पूर्ण करुन कामासाठी देण्यात आलेला निधी ३१ मार्चअखेर खर्च होईल, यादृष्टीने कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, नवीन बसस्थानक, परकाळे बंगला येथील कालवा सुशोभिकरणाअंतर्गत करण्यात येणारी कामे, श्रीमंत बाबुजीनाईक वाडा व परिसरातील विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी

मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय परिसरात व्यवस्थितपणे पाण्याचा निचरा होईल असे पेव्हर ब्लॉक बसवा. परिसराची  आकर्षक रंगरंगोटी करावी. मेडद येथील नागरिकांसाठी बगीचा करण्याबाबत नियोजन करा. परिसरातील कऱ्हा नदी सुशोभीकरण व पुलांची  कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. नदी सुशोभिकरणाची कामे करतांना पाण्याच्या प्रवाह सुरळीत राहील, याबाबत काळजी घ्या.  याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात अधिकाधिक सुविधा मिळतील यादृष्टीने कामे करावीत. परिसरातील स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीनेही नियेाजन करा, असे निर्देश श्री.पवार यांनी दिले आहेत. परकाळे बंगला येथील कालवा सुशोभिकरणा अंतर्गत कामे करतांना अधिकाधिक वृक्षारोपण करावे व  परिसर स्वच्छ राहील, याची काळजी घ्या. काम पूर्ण झाल्यानंतर समाधान वाटले पाहिजे, यादृष्टीने बारकाईने लक्ष ठेवून कामे करावीत.

https://nirbhidvartmaan.com/deputy-chief-minister-ajit-pawar/

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणी

शासकीय कार्यालयात स्वच्छता ठेवा

प्रशासकीय भवन व परिसरातीची पाहणी करुन श्री. पवार म्हणाले,  शासकीय कार्यालय व परिसरात स्वच्छ राहील, याकडे लक्ष द्यावे. कार्यालयाच्या अंतर्बाह्य भागात लावण्यात येणारे फलक एकसारखे लावावे. विजेच्या तारा लटकता कामा नये. कार्यालयाचे नुतनीकरण करतांना सर्वसुविधानी युक्त कार्यालय असेल, अशी कामे करावीत. परिसरातील बगीच्यासाठी नगरपरिषदेच्या शुद्धीकरणप्रकल्पाअंतर्गत प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापर करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुंबई शहर जिल्ह्याचा ५२० कोटींच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

नवीन बसस्थानकाचे लवकरात लवकर उद्धघाटन करुन नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करा. मध्यवर्ती भागात नागरिकांना सावली देणाऱ्या वृक्षाची लागवड करा. वृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजे तसेच परिसर स्वच्छ राहील, याकडे लक्ष द्यावे.

बाबुजीनाईक वाडा व परिसरातील नागरिकांची सुरक्षिततेचा विचार करुन पोलीस चौकी उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करा. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक, आणि दिव्यांग नागरिकाच्या सुरक्षिततेदृष्टीने पायऱ्या व शौचालयाची व्यवस्था करावी,  अशा सूचना श्री.पवार यांनी दिल्या.

सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे. निधी अभावी कामे प्रलंबित राहू नये. कामेवेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री वाढवावी. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,  उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले

यावेळी अपर पोलीस पोलीस अधीक्षकआनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील पावडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापक वृषाली तांबे,  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!