ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेल्स टॅक्स अधिकारी असल्याचे भासवुन फसवणुक करणाऱ्यांना आरोपीतांना ७ तासाच्या आत केले जेरबंद

वर्तमान टाइम्स वृत्तसेवा :- फिर्यादी श्री जठाराम भडाजी प्रजापती वय २८ वर्षे, हे श्री बाबूलाल छोगाजी प्रजापती वय ३८ वर्षे या अंगडीवाकडे पैसे तसेच कपडयाचे पार्सल घेणे-देण्याचे काम करतात.

दिनांक २५/०२/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वा. सुमारास फिर्यादी हे श्री विष्णू कांती अंगडीया यांचेकडून त्यांचे शेठ श्री बाबूलाल छोगाजी प्रजापती यांचे व्यवहाराचे ३२,००००० /- रु घेवून पायी येत असताना आदर्श हॉटेलजवळ, काळबादेवी रोड येथे एक अनोळखी व्यक्ति व महिला यांनी ते सेल्स टॅक्स अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी यांचेकडील ३२,००००० /- रु व त्यांचा मोबाईल फोन किंमत अंदाजे १५,०००/- रुपये असे एकुण ३२,१५०००/- रुपये किंमतीची मालमत्ता फसवणूक करून घेवून गेले म्हणून फिर्यादी यांनी त्यांचेविरूध् कायदेशिर तक्रार दिल्याने त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून गु.र.क्र. १२१/२३, कलम , ३६५, ४२०, १७०, ३४ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुह्याचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हयातचे घटनास्थळ व आजुबाजुच्या परिसरातुन सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. आरोपीने वापरलेली मो/ सायकल याचा माग काढुन गुप्त बातमी दाराच्या मार्फतीने गुन्हयातील पाहिजे आरोपीताचा मंगलदास मार्केट परिसरात शोध घेवुन ताब्यात घेन्यात आले. त्याच्याकडे सखोल तपास करता त्याने त्याचे नाव संजयसिंग अजमेरसिंग करचोली, हिं. ३३ वर्षे असे सांगुन, तो मंगलदास मार्केट याठिकाणी सुरक्षा रक्षक सुपरवायझर म्हणुन काम करीत असल्याचे सांगुन त्याच्या सोबत सुरक्षा रक्षक म्हणुन काम करणारी त्याची साथीदार नामे रजिया अजिज शेख, मु. ३६ वर्षे हिचे मदतीने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने दोघांनाही नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपीतांना रिमांडकामी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दि. ०१/०३/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस सहआयुक्त, (का. व. सु) श्री सत्यनारायण, मा. अप्पर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग), मुंबई, श्री. दिलीप सांवत, श्री. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, मुंबई, श्री. जोत्स्ना रासम, सहायक पोलीस आयुक्त, पायधुनी विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. ज्योती देसाई यांच्या अधिपत्याखालील स.पो.नि. राहुल भंडारे, स.पो.नि. इलग, स.पो.नि. बनकर, पो.उ.नि. रुपेश पाटील, पोउपनि लाड म.पो.उप.नि. भाले व गुन्हे प्रकटीकरण पथकांचे पो.ह. कांबळे, पो.ह. सानप, पो.ह पाटील, पो.ह. मुन्नासिंग पो.शि. मोरे, शेंडे, वाकसे, बगळे, होटगीकर, जोशी यांनी अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!