ताज्या घडामोडीपुणे

सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार अड्डयावर छापा टाकुन ३४,७१०/- रू. चा मुद्देमाल जप्त..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- खराडी बायपास, पुणे परीसरात काही लोक बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची खात्रीशीर बातमी आपल्या बातमीदारामार्फत सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी यांना प्राप्त झाली .

मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १५ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून जुगारातील रोख रक्कम, व जुगाराचे साहित्य असा एकुण ३४,७१०/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा १६ इसमांविरूध्द विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुरनं १०१ / २०२३ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यांना पुढील कारवाई करीता विमानतळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. अमोल झेंडे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, या पथकाने यशस्वी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!