ताज्या घडामोडीपुणे

चाकण एमआयडीसीतील कंपनीत दरोडा टाकणारे पाच आरोपींना केले जेरबंद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- चाकण एमआयडीसीतील टेक्नोड्राय सिस्टम इंजिनिअरींग प्रा.लि. मध्ये दि. 17 तारखेला पहाटे पाचच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी कंपनीतील सिक्युरीटी गार्ड दिलनवाज मोहंमद खान याला चाकुचा धाक दाखवुन तसेच दुसरा सिक्युरीटी गार्ड नामदेव मरिबा भोगे याला लोखंडी रॉडने मारण्याची धमकी देवुन त्याचे हातपाय दोरीने बांधुन कंपनीतील स्टेनलेस स्टिल व माईल्ड स्टिल एकुण ८०० किलो स्क्रॅप सुमारे ९१,३००/- रू. किंमतीचा मुददेमाल छोटा हत्ती टॅम्पो मध्ये भरून चोरून नेण्यात आला होता याबाबत चाकण पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केलेला होता.

गुन्हयाचे गांर्भिय लक्षात घेवुन चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनानुसार अनिल देवडे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी व डि. बी. पथकाने कंपनीतील सिक्युरीटी गार्ड यांचेकडे चौकशी सुरू केली. कंपनीतील सीसीटीव्ही तपासातुन त्यामध्ये समोर आलेल्या बाबी तसेच कंपनीतील सिक्युरीटी गार्ड दिलनवाज खान याचेकडे चौकशी करत असतांना तो सांगत असलेल्या माहितीमध्ये वारंवार तफावत असल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे सहकारी अन्वर अली, मोहंमद हनिफ मोहंमद शफी शेख, रिझवान अहमद अबुसामा चौधरी, जसरूददीन वसीउददीन चौधरी, दिपक युवरा सुरवाडे, सर्व रा. शिळफाटा, मुंब्रा ठाणे यांचेसोबत मिळुन नियोजनबध्द कट रचुन सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपी १) दिलनवाज मोहंमद शफी खान वय ५४ रा. गुन्हयात अटक केली, त्यानंतर चाकण पो स्टे कडील डि. बी. पथकाने आरोपी २) मोहंमद हनिफ मोहंमद शफी शेख, वय ३२ वर्षे, ३) रिझवान अहमद अबुसामा चौधरी, वय २२ वर्षे, ४) जसरूददीन वसीउददीन चौधरी, वय २३ वर्षे, ५) दिपक युवरा सुरवाडे, वय २३ वर्षे, मुंब्रा, ठाणे येथुन शिताफिने ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक केलेली आहे. अटक आरोपींकडुन गुन्हयातील चोरी केलेला स्टेनलेस स्टिल व माईल्ड स्टिल एकुण ८०० किलो स्क्रॅप सुमारे ९१,३०० /- रु. किंमतीचा गुन्हयातील चोरी गेलेला सर्व मुददेमाल तसेच गुन्हयात वापरलेली छोटा हत्ती टॅम्पो नं एम एच ०३ सी व्हि ४३२६ ही व आरोपींचे गुन्हयात वापरलेले मोबाईल फोन असा एकुण ३,३६,३००/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शन खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, मपोना भाग्यश्री जमदाडे, पोकॉ / नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि विक्रम गायकवाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!