पुणेसामाजिक

पोलीस रेझिंग डे निमित्त दिशा उपक्रम अंतर्गत वस्ती / झोपडपट्टी भागातील बालकांचा गौरव..!!

बालकल्याण सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते / प्रतिनिधी यांचा गौरव समारंभ..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- विशेष बाल पथक व निगडी पोलीस स्टेशन यांनी पोलीस रेझिंग डे निमित्त निगडी पोलीस स्टेशन येथे मा. श्री. विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांचे संकल्पनेतुन राबविण्यात येणाऱ्या “दिशा” या उपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाणेहद्दीमध्ये वस्ती / झोपडपट्टी भागामध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला / गृहिणी समिती, बालकल्याण सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते / प्रतिनिधी, पोलीस ठाणे स्तरावर नेमण्यात आलेले समन्वयक पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड यांचे उपस्थितीत दिशा भरकटलेल्या बालकांचा व सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमास २०० हुन अधिक महिला व सामाजिक कार्यकर्ते समन्वयक व पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते..

कार्यक्रमात शाळाबाहय मुले व व्यसनाधीन मुलांनी दिशा उपक्रम सुरु केल्यामुळे कसा सकारात्मक बदल झाला आहे याबाबत आपला अनुभव व्यक्त केला. यावेळी बोलताना मा. श्री. काकासाहेब डोळे पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ०२, पिंपरी चिंचवड यांनी उपस्थित सर्व महिला / गृहिणी समिती, सामाजिक कार्यकर्ते / प्रतिनिधी यांचे दिशा उपक्रमामध्ये सहभागी झालेबददल अभिनंदन केले.

महिला / गृहिणी समिती व समन्वयकांच्या माध्यमातुन व्यसनाच्या आहारी गेलेले बालक तसचे शाळाबाह्य बालकांना गुन्हेगारी मार्गावर जाण्यांपासून परावृत्त करुन त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दलाकडुन आणखी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगुन उपस्थित सर्व महिला गृहिणी समिती, सामाजिक कार्यकर्ते / प्रतिनिधी यांना समाजासाठी आपण देत असलेले योगदान खरच कौतुकास पात्र असुन यामुळे नक्कीच या बालकांना योग्य दिशा मिळणार असल्याचे सांगुन पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

मा. श्री. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी “दिशा” या उपक्रमाची थोडक्यात माहिती करुन दिली. तसेच बालके व्यसनाचे आहारी जावु नयेत यासाठी सर्वांनी एकत्र मिळुन काम करणे, जनजागृती करणे व व्यसनाचे आहारी गेलेल्या बालकांचे समुपदेशन व पुनर्वसन करणे आवश्यक आहे. दिशा उपक्रमामुळे बालकांच्या मध्ये कसा सकारात्मक बदल झालेला आहे याबाबतची माहिती दिली. दिशा उपक्रम अंतर्गत संपुर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हददीमध्ये घेतलेले एकुण कार्यक्रम ७४ घेण्यात आले.

तसेच शाळाबाहय बालकासाठी समुपदेशन करण्यात आलेल्या बालकांची संख्या ३४५ असुन व्यसनमुक्ति केंद्रात दाखल केलेल्या बालकांची संख्या- ०२, व्यसनमुक्ति संदर्भात समुपदेशन करण्यात आलेल्या बालकांची एकुण संख्या २१४, दिशा उपक्रम संदर्भात राबविलेले इतर उपक्रम २५ तसेच एकुण १४ शाळाबाहय बालकांना कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसताना जिल्हा परिषद शाळेत अॅडमिशन करुन दिले. (रावेत-०७, तळेगाव-०५, भोसरी एमआयडीसी ०२), भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीत बालाजीनगर झोपडपटटी येथे विदयार्थ्यासाठी वाचनालय सुरु केले. त्यासाठी लागणारे कपाट, पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली.

दिशा उपक्रम अंतर्गत एकुण १२ शाळाबाहय मुलांना “तेरे देस होमस” या सामाजिक संस्थेच्या मदतीने कोहीनुर इन्स्टीटुट काळभोर नगर येथे मोफत मोबाईल रिपेअरिंग कोर्स उपलब्ध करुन सुरु देण्यात आलेला आहे. असे बोलून सर्व महिला समिती, सामाजिक कार्यकर्ते यांचे मदतीने एकत्र येवुन असे उपक्रम राबविल्यास अशा बालकांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून मोलाचे काम आपल्याकडून घडत आहे असे बोलुन उपस्थित सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देवुन सर्व सामाजिक संस्थांचे ऋण व्यक्त केले. व दिशा उपक्रम अंतर्गत चांगली कामगिरी करणारे रावेत, भोसरी एमआयडीसी, तळेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी, अंमलदार, समन्वयक यांचादेखील गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. काकासाहेब डोळे पोलीस उप-आयुक्त परिमंडळ -२ यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन श्री. रंगनाथ उंडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक निगडी पोलीस स्टेशन, व श्री. देवेंद्र चव्हाण पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, विशेष बाल पथकाचे श्री. संपत निकम (श्रेणी पोलीस उप-निरीक्षक), मपोना/ दिपाली शिर्के, पोशि/ अमोल मुठे, पोशि/ भुषण लोहरे यांनी केले.

कार्यक्रमास मा. श्री. संजय शिंदे स्, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, श्री. काकासाहेब डोळे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ – २) तसेच सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व समन्वयक पोलीस अधिकारी यांचेसह महिला / गृहिणी समिती, सामाजिक कार्यकर्ते / प्रतिनिधी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!