पुणे

कोयत्याने दहशत करणा-या सराईतांच्या समर्थ पोलीसांनी आवळल्या मुसक्या..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- नवावाडा भागात पहाटे काही इसमांची आपसात भांडणे झाली होती, त्या भांडणाचा राग मनात धरून काही सराईत गुन्हेगार यांनी हातात कोयते घेवुन, नवावाडा भागात दहशत निर्माण केली होती. याबाबत समर्थ पो स्टे ०१ / २०२३, भादविक १४३,१४७,१४८,१४९,५०४, ५०६ (१), ५०६ (२), महा. पो. का. क. ३७ (१) (३) १३५, आर्म अॅक्ट ४ (२५), क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट क. ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल आहे.

तपास पथकाचे सपोनि प्रसाद लोणारे व पो.उप निरी. सौरभ माने यांचे पथकाने तात्काळ घटनास्थळी जावुन तांत्रिक विश्लेषणाव्दारे गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून, त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामध्ये १) गगन अमरीकसिंग मिशन, वय १९, २ ) अमन युसुफ खान, वय २२, ३) अरसलन तांबोळी, वय-२७, ४) मंगेश कैलास चव्हाण, वय २४, ५) गणेश प्रकाश पवार, यांना अटक केली असुन व इतर पाहिजे आरोपी आहेत. त्यांचा शोध घेवुन तात्काळ अटक करण्यासाठी पोलीसांचे एक पथक रवाना झाले आहे.

आरोपींच्या दहशतीमुळे नागरीकांनी न घाबरता पोलीसांना माहीती दयावी, त्यावर पुणे पोलीस कोणत्याही गुन्हेगारांची गय न करता नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेशकुमार, मा. पोलीस सहआयुक्त, श्री. संदीप कर्णीक, मा. पोलीस उप-आयुक्त, श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १, पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे, श्री.सतिश गोवेकर यांनी केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. राजेंद्र डहाळे मा. पोलीस उप-आयुक्त श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १, पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रमेश साठे, समर्थ पो.स्टे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, प्रसाद लोणारे, पोउनि सौरभ माने, पोलीस अंमलदार, हेमंत पेरणे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, प्रमोद जगताप,रोहीदास वाघीरे, सुभाष पिंगळे, रहिम शेख, कल्याण बोराडे व श्याम सुर्यवंशी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!