संपादकीय

हातातल्या मोबाईलचा, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करावा, काढा फोटो व करा तक्रारी..!!

अयोग्य व अवैद्य गोष्टी खपवून न घेता संबंधित जबाबदार खात्याला माहिती पुरवा..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मित्रांनो आपल्या हातातल्या मोबाईलचा, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करूयात..! काढा फोटो करा तक्रारी,

हेच गर्दुल्ले आपल्या शहरातील पुलांच्या खाली नशेच्या विळख्यात पडलेले असतात ना..?

मटका, जुगार पडदे लावुन खुलेआम आपल्या शेजारी खेळतात माहिती आहे ना..? मग लाजायचे कोणाला, घाबरायचे कोणाला..?

आपण, आपली मुले, मुली, महिला दरोरोज बघतो त्याच रस्त्याने जातो, त्याच स्टॉप ला दररोज थांबतो, लाईट नसते, झाकणे उगडी असतात, रस्ते उखडलेले असतात, खड्डे पडलेले असतात?

पण आपण काय करतो? कोणीतरी पडते, मरते, गर्दुल्ले हात उगारतात, रात्रीची बेवड्यांची भांडणे होतात, खून होतो आपण काय करतो..?

फक्त दोन फोटो काढायचे आहेत आणि इंस्टाग्राम ला न टाकता, ट्विटर ला टाकायचे आहेत, मेल करायचा आहे, एवढेच ना, आपण करू शकतो की नाही..?

जातपात, राजकारणाच्या पलिकडे जाऊयात, थोडे माणूस म्हणून विचार करूयात, जगुयात..!

मित्रांनो, जागे व्हा, चला आता जागरूक होऊयात, आपले हक्क अधिकार आणि कर्तव्ये यांना जागे करूयात..?

काहीच सजग नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव आपली सामाजिक जबाबदारी म्हणून तक्रार करतच असतात आपणही आपला खारीचा वाटा उचलुयात दिसलेले लपवायचे नाही, त्या पासून दुर पळायचे नाही, आपली जबाबदारी पार करूयात एक काॅल 112 व ट्विटर वर संबंधित वरिष्ठ अधिकारी, मंत्री टॅग करून पोस्ट करायची..!

आपण बद्दलो तरच समाज व देश बदलेल..!!

By Sandeep Kamble

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!