ताज्या घडामोडीपुणे

14 वर्षापुर्वीच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल, प्रकाश चव्हाण गॅगच्या आरोपीला ठोकल्या बेडया..!!

पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट 1 ची पुन्हा एकदा उल्लेखनिय कामगिरी..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:-  दि. 21/04/2008 रोजी बालाजी नगर झोपडपटी, भोसरी या ठिकाणी आरोपी आप्पा गोमाजी मोहिते, वय 50 वर्ष याने अनैतिक संबधास बाधा ठरणा-या त्यांचे मैत्रीणीस के. एस. बी. चौक, पिंपरी येथुन जबरदस्तीने अपहरण करुन तिला त्याचे घरात कोंढुन ठेवले व नंतर तिची निर्घुनपणे हत्या केल्यावरुन भोसरी पोलीस स्टेशनला गु.र.क्र. 163 / 2008 कलम 302,366,342 भा. द.वी. अन्वये गुन्हा दाखल झालेला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपी गायब होता. नियमितपणे तो त्याचा पत्ता बदलत होता. तो त्याचे मुळ गावी तसेच सासुरवाडीस पण मिळुन येत नव्हता.

आरोपी हा एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीतील प्रकाश चव्हाण या गॅगचा सक्रिय सदस्य असल्याने तसेच त्याच्याविरोधात यापुर्वी खुन खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत सारखे गुन्हे दाखल असल्याने पोलीसांनी तपासाची दिशा बदलुन त्याचे 15 वर्षापुर्वीचे सहआरोपी व प्रकाश चव्हाण गॅगचे सदस्य याच्या मार्फ़तीने तपास करण्याचे ठरविले.

त्यानुसार तपास करत असताना माहिती मिळाली की आरोपी आप्पा गोमाजी मोहिते हा सध्या मु.पो. वाकी, ता. राजगुरुनगर, जिल्हा पुणे या खेडेगावात लपुन राहत असुन चाकण एमआयडीसी मध्ये मिळेल त्याप्रमाणे मजुरी काम करत आहे. तसेच तो लवकरच औरंगाबाद येथे जाणार असल्याचे समजले. पोलीसांनी वाकी गावात जावुन गोपणीय माहिती काढली असता तो तेथे नाव बदलुन राहात असल्याचे समजले. तसेच दिवसभर तो चाकण एमआयडीसी मध्ये मिळेल ते काम करत असल्याने दिवसा घरी नसल्याची माहिती मिळाली. आरोपीचा 15 वर्षापुर्वीचा फ़ोटो असल्याने व सध्य स्थितीमधिल फ़ोटो उपलब्ध नसल्याने त्यास चाकण एमआयडीसी परिसरात शोधणे अवघड होते. त्यामुळे पोलीसांनी वाकी परीसरात सापळा लावुन त्यास रात्री घरी जात असताना ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मयत महिलेबरोबर त्याचे अनैतिक संबंध असल्याचे सांगुन ती त्याचे पत्नीस घटस्फ़ोट घेवुन तिच्याशी लग्न कर नाहितर बलात्काराचा गुन्हा दाखल करील अशी धमकी देत असल्याने तिचा खुन केला असल्याचे त्याने कबुल केले. आरोपीस पुढील कारवाई साठी भोसरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोजकुमार लोहीया, अप्पर पोलीस आयुक्त संजयकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस नाईक महाडीक, पो.ना. सचिन मोरे, पो.शि. गर्जे, पो.शि.महाले यांचे पथकाने केली आहे. तपासकामात पो.ह. कमले व तात्रीक शाखेचे पो.ह. प्रशांत माळी यांनी विशेष सहकार्य केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!