ताज्या घडामोडी

धुमस्टाईल गळ्यातील सोन्याचे दागीने खेचुन नेणारे अट्टल चैन चोरांना हिंजवडी पोलीसांनी केली अटक..!!

हिंजवडी पोलीस तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी.!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दिनांक २३/११/२०२२ रोजी २०:१५ वा. सुमारास, हैदराबाद बिर्याणी हाऊस समोर हिंजवडी फेज ३, ता. मुळशी, जि. पुणे येथे पायी चालत जाणाऱ्या फिर्यादी सौ. संगीता मधुकर धुमाळ यांचे मागुन मोटारसायकलवरून येऊन दोन चोरांनी त्यांचे गळ्यातील मंगळसुत्र जबरदस्तीने खेचुन चोरून घेऊन गेल्या बाबत गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचे अनुषंगाने तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सागर काटे व राम गोमारे असे तपास पथकातील अंमलदारांसह दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना एकुण ५२ सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढत असताना, सपोनि सागर काटे यांना त्यांच्या विश्वासु बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार, मेगापोलीस सर्कल, फेज ३, हिंजवडी पुणे येथे पल्सर क्र एमएच१६/ सीके ७८९७ वरून, हैदराबाद बिर्याणी हाऊस फेज ३. गवारवाडी रोड, हिंजवडी पुणे येथील चैन चोरी मधील इसम मोटारसायकलसह येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळालेने मेगापोलीस सर्कल, हिंजवडी, पुणे येथे आजुबाजुस पाळत ठेऊन पल्सर क्र एमएच१६/सीके ७८९७ हिचेवरुन आलेल्या इसमास पोलीस असल्याचे  सांगुन त्याने तेथे असण्याचे कारण विचारता, तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस स्टाफने आकाश वजीर राठोड, वय २२, रा. राहुल तापकीर कचरा प्लान्ट जवळ, गणेश तापकीर वीट भट्टी शेजारी, मुलखेड, ता. मुळशी, जि. पुणे यांस जागीच पकडले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटलेने त्यास पोलीस ठाण्यास आणुन तपास करता त्याने दाखल गुन्हा हा त्याचा साथीदार अमर राठोड याचेसह येऊन केला असल्याचे सांगुन यातील चोरलेले फिर्यादीचे मंगळसुत्र त्याने सोमपाल नारायण सिंह, वय ३१, रा. हरवर, हार्बर, डुंगारपुर, पाल, निठाऊवा, राजस्थान यास विकल्याचे सांगीतले व सदर इसम हा त्याला भेटण्यासाठी येणार असल्याचे सांगीतल्याने त्यास सापळा रचुन ताब्यात घेऊन दि. ३/१२/२०२२ रोजी ११:५० वा. अटक करण्यात आली. आरोपीकडे दाखल गुन्ह्यातील चोरलेले मंगळसुत्रा बाबत तपास करता ते त्याने अहमदाबाद गुजरात येथे असल्याचे सांगीतलेने अहमदाबाद गुजरात येथे जाऊन सदर मंगळसुत्र जप्त करण्यात आले.

आरोपी आकाश वजीर राठोड, यास पोलीस कोठडीत असताना विश्वासात घेऊन त्याचेकडे कौशल्याने तपास करून तसेच तांत्रीक विश्लेषण करून त्याने त्याचे साथीदार १) बिश्रांत नानावत २) मंगल नानावत ३) अमर राठोड यांचे साथीने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या जबरी चोरी निष्पन्न करून त्यापैकी १४ मंगळसुत्र व २ दुचाकी वाहन जप्त करण्यात आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे.

१)७०,०००/- रू एक पल्सर मोसा क्र एमएच १६/सीके ७८९७

२)६०,०००/- रु एक १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र ३)६०,०००/-रू. एक ९.८३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन.

४)६५,०००/- रू. एक सोन्याच मिनी गंठण, दोन वाट्याचे १३.१७० ग्रॅम वजनाचे

५)५०,०००/-रू. एक सोन्याचे १२.४८० ग्रमचे मिनी मंगळसुत्र दोन सोन्याच्या वाट्या असलेले

६) ६०,०००/-रू. एक १२.१३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण

७)६०,०००/- रू.एक ९.८५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र

८)९८,०००/- रू. एक सोन्याचे मिनी गंठण, त्याला अर्धगोलाकार आकाराचे पेंडल, १९.८९० ग्रॅम वजनाचे

९) ५०,०००/- रू.एक मंगळसुत्र एक पदरी ८.९८० ग्रॅम वजनाचे, त्यात काळे मणी व दोन सोन्याच्या वाट्याचे

१०) ५०,०००/- रू.एक मंगळसुत्र एक पदरी ८.९८० ग्रॅम वजनाचे, त्यात काळे मणी व दोन सोन्याच्या वाट्याचे ९८,०००/-रु.एक १९.६२० ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, त्यात काळे मणी सोन्याचे चेनमध्ये

११) १,४५,०००/- रू एक चेन डिझाईनचे २२.४०० ग्रॅम चे सोन्याचे मगळसुत्र दोन वाट्याचे

१२) १,४५,०००/- रू एक २९.९२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण

१३) ७५,०००/- रू एक १५.६२० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन

१४) ५०,०००/- रू एक सोन्याची साखळी १०.२८० ग्रॅम वजनाची

१५) ७५,०००/- रू.एक १५.३०० ग्रॅम वजनाचे डबल चेन असलेले सोन्याचे मंगळसुत्र त्यात काळे मणी व सोन्याच्या दोन वाट्या असलेले

१६) १०,०००/-रू. एक हिरो होंडा कंपनीची प्लेझर मोपेड क्र. MH 12/GJ0395 तीचा इंजीन क्र. JF16EBAGJ04650 चासी क्र. MBLJF16EDAGJ04084 असलेली १,१७१,०००/-रू

 

वरील जप्त मालावरुन खालील पोलीस ठाण्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 

१) तळेगाव पोलीस ठाणे गुरनं ४३० / २०२२ भादवि कलम ३९२.३४

२) तळेगाव पोलीस ठाणे गुरनं ४३१/२०२२ भादवि कलम ३९२

३) कामशेत पोलीस ठाणे गुरनं २१६/२०२२ भादवि कलम ३९२,३४

४) रावेत पोलीस ठाणे गुरनं १०७/२०२२ भादवि कलम ३९२

५) रावेत पोलीस ठाणे गुरनं ११७/२०२२ भादवि कलम ३९२,३४

६) चिंचवड पोलीस ठाणे गुरनं ५१५/२०२२ भादवि कलम ३९२.३४

७) पिंपरी पोलीस ठाणे गुरनं १०१५/२०२२ भादवि कलम ३९२,३४

८) चिखली पोलीस ठाणे गुरनं ५३३/२०२२ भादवि कलम ३९२,३४

९) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गुरनं ६२४/२०२२ भादवि कलम ३९२.३४

१०) सासवड, पुणे ग्रामीण पोलीस ठाणे गुरनं ४५८/२०२२ भादवि कलम ३९२,३४

११) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ८६२/२०२२ भादवि कलम ३९२,३२३,३४

१२) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ५९/२०२२ भादवि कलम ३९२,३४

१३) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं २६७/२०२२ भादवि कलम ३९२,३४

१४) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ११२२/२०२२, भादवि कलम ३९२,३४

१५) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं १०५०/२०२२ भादवि कलम ३७९

१६) सुपा पोलीस ठाणे, अहमदनगर गुरनं ३४२/२०२२ भादवि कलम ३७९

अटक आरोपी यांचेकडुन वरील गुन्हयात वापरलेली ७०,०००/- रुपये किं. च्या पल्सर मो सा क्र एमएच १६/सीके ७८९७ तसेच चोरीचे गुन्ह्यातील प्लेजर मोपेड क्र एमएच १२/जीजे ०३९५ तसेच १०,९१,०००/रुपये किंमतीच्या १४ सोन्याच्या चैन/मंगळसुत्र एकुण २२ तोळे वजनाच्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गोमारे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री अंकुश शिंदे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ संजय शिंदे सो, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड, मा. श्रीकांत डिसले, सहा.पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे तपास पथकाचे प्रमुख सपोनि, सागर काटे, राम गोमारे, पोउनि रमेश पवार, पोलीस अंमलदार, बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत, मपोशि सोनाली ढोणे यांनी केली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!