ताज्या घडामोडीपुणे

हवेत गोळीबार करणा-या तीन आरोपीतांना ०४ तासात अटक..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा

दिनांक ०६/१२/२०२२ रोजी सायंकाळी पत्राशेड झोपडपट्टी, रेल्वे लाईन जवळ, लिंकरोड चिंचवड येथे एका रिक्षा मधुन आलेल्या तीन इसमांनी हवेत फायरिंग केलेबाबत गुन्हे नियंत्रण कक्ष येथुन माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना घटनास्थळी भेट देवुन आरोपींना तात्काळ अटक करणेबाबत आदेशीत करण्यात आले होते. त्याप्रमाणे दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे व अंमलदार असे गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाबाबत सविस्तर माहिती घेवुन, वपोनि इंगवले यांनी पथकास गुन्हयाचे अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अधिक माहिती घेतली असता सदर गुन्हयात शाहरूख शेख हा आरोपी असल्याचे दिसुन आले.

आरोपी शाहरूख शेख हा दापोडी येथे राहणारा असल्याने, सदर परिसरात आरोपीचा शोध घेत असताना, पोलीस शिपाई गणेश सावंत, विनोद वीर व सुमीत देवकर यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे आरोपी नामे शाहरुख शाहनवाज शेख, वय – २९ वर्षे, गुलाबनगर, दापोडी, पुणे यास सापळा लावुन, शिताफिने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दाखल गुन्हयाची अधिक चौकशी करता, त्याने गुन्हा हा त्याचे साथीदार शोएब अलवी, सागर मलीक उर्फ मायकल व फारूख शेख यांचेसह मिळुन केल्याची कबुली दिली. आरोपी शाहरूख शेख याचे मदतीने त्याचे इतर दोन आरोपीचा शोध घेत असताना, आरोपी मोहम्मद शोएब नौसार अलवी, वय – २६ वर्षे, रा – माता सटवाई मंदीर शेजारी, पवार वस्ती, दापोडी, पुणे यास शिताफीने ताब्यात घेतले. तसेच फारूख शाहनवाज शेख, रा- गुलाबनगर, दापोडी, पुणे यास गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे.

आरोपी शाहरूख शेख व मोहम्मद शोएब अलवी हे दोघे दापोडी येथे एकाच परिसरात राहत असल्याने ते मित्र आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता, शाहरूख शेख याचा भाऊ इरफान शेख याचे गुन्हयात नाव घेतल्याचा शाहरूख यास राग होता. त्याबाबत त्याने मोहम्मद शोएब अलवी यास सांगितले होते. या कारणावरून दिनांक ०६/१२/२०२२ रोजी शाहरूख शेख, मोहम्मद शोएब अलवी व त्यांचा मित्र सागर मलीक उर्फ मायकल असे तिघे शोएब अलवी याचे रिक्षामधुन पत्राशेड लिंकरोड चिंचवड येथे फिर्यादीच्या घरासमोर येवुन, फिर्यादीस शाहरूख शेख याने त्याचा भाऊ इरफान शेखयाचे गुन्हयात नाव का घेतले असे म्हणुन शिवीगाळ केली. त्यावेळी मोहम्मद शोएब अलवी याने शेजारील किराणा स्टोअरमध्ये असलेल्या इसमांस सीसीटिव्ही बंद कर अशी धमकी देवुन, त्यास मारहाण करून, शिवीगाळ केली, गोळीबार केला. त्यादरम्यान तेथे फारूख शेख हा आला त्याने देखील फिर्यादीस शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर त्यांनी रिक्षामधुन लिंकरोड भाटनगर व बौध्दनगर येथे जावुन पुन्हा हवेत गोळीबार केला होता.

सदरची कारवाई पिंपरी -चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ श्री. विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पद्माकर घनवट, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्री. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास इंगवले, पोलीस उप निरीक्षक श्री. मंगेश भांगे व अंमलदार, युनिट १ चे वपोनि श्री. काटकर व अंमलदार, युनिट २ चे वपोनि श्री नांदुरकर व अंमलदार, युनिट ३ चे वपोनि श्री गायकवाड व अंमलदार तसेच गुंडा विरोधी पथकाचे सपोनि हरिष माने व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!