ताज्या घडामोडीपुणे

पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा

पुणे येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग(लष्करी अभियांत्रिकी) महाविद्यालयाच्या सर्वत्र हॉलमध्ये आज शानदार पदवी प्रदान (स्क्रोल प्रेझेंटेशन) समारंभ पार पडला. अभियांत्रिकी अधिकारी पदवी अभ्यासक्रम (ईओडीई) आणि तांत्रिक प्रवेश योजना अभ्यासक्रमांसाठी (टीईएस) प्रवेश घेतलेले 42 भारतीय लष्करातील अधिकारी तर भूतान, श्रीलंका आणि मालदीवच्या सहा लष्करी अधिकाऱ्याना अभियांत्रिकीमधील पदव्या प्रदान करण्यात आल्या. एकूण 35 अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकीमधून पदवीधर झाले तर चार विद्युत अभियांत्रिकी आणि नऊ अधिकारी यांत्रिकी अभियांत्रिकीमधून पदवीधर झाले आहेत. लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग, पीव्हीएसएमस एव्हीएसएम, व्हीएसएम , एडीसी, मुख्य अभियंता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते अधिकाऱ्याना पदवी आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या भाषणात ले. जन. हरपाल सिंग यांनी पायाभूत सुविधा उभारणीच्या कामात शाश्वत आणि हरित निकष स्वीकारून अभियांत्रिकी क्षेत्रातील ताज्या आणि नवनवीन तंत्रज्ञानाबाबत स्वतःला अद्ययावत ठेवण्याच्या महत्वावर जोर दिला.

लेफ्टनंट जनरल अरविदं वालिया, कमांडंट, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी आपल्या स्वागताच्या भाषणात पदवीधर अधिकाऱ्याना आपले सर्व ज्ञान व्यावहारिक आणि नाविन्यपूर्ण रित्या वापरात आणण्याचे आवाहन केले.

स्थापत्य अभियांत्रिकीमधील प्रतिष्ठेचे समजले जाणारे सुवर्णपदक ईओडीई 124 अभ्यासक्रमाचे कॅप्टन ऐश्वर्य कुमार चौहान यांना आणि टीईएस 38 अभ्यासक्रमासाठी लेफ्टनंट वैभव भोसले यांना प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे, विद्युत अभियांत्रिकीमधील सुवर्णपदक ईओडीई 124 अभ्यासक्रमाचे कॅप्टन मृणाल यादव आणि टीईएस 38 अभ्यासक्रमासाठी लेफ्टनंट अंकित कुमार यांना प्रदान करण्यात आले.

पदवीधर झाल्यानंतर, या अधिकाऱ्यांना लढाऊ अभियांत्रिकी कामगिरी, सशस्त्र दलातर्फे चालवले जाणारे बांधकाम प्रकल्प, सीमावर्ती भागातील रस्ते प्रकल्प आणि सरकारने सोपवलेल्या राष्ट्रउभारणीच्या प्रकल्पांत नेमणूक करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!