*संगमनेर: संगमनेर शहराच्या सुशोभीकरण प्रक्रियेत आता महामानवाच्या स्मृतींना उजाळा देणारा एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराचे सौंदर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी **’भीम संस्कार ऑर्गनायझेशन’* ने केलेल्या विधायक पाठपुराव्याला मोठे यश आले असून, स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लवकरच भव्य आणि आकर्षक *‘I Love Ambedkar’* हा ३D एलईडी लायटिंग बोर्ड बसवण्यात येणार आहे. संगमनेर नगर परिषदेने या संदर्भात अधिकृत पत्राद्वारे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
**विकासाच्या प्रवाहात महामानवाचा गौरव**
संगमनेरचे *लोकनेते माजी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात* यांच्या मार्गदर्शनाखाली आणि *नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजितदादा तांबे* यांच्या कल्पक नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास अत्यंत वेगाने सुरू आहे. हे सुशोभीकरण करताना ऐतिहासिक वारसा आणि महापुरुषांच्या स्मारकांचा सन्मान राखणे ही शहराची प्रदीर्घ परंपरा राहिली आहे. याच परंपरेला अनुसरून *RPI उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष* तसेच *नॉन पॉलिटिकल भीम संस्कार ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत दारोळे* यांनी स्मारकाच्या ठिकाणी महामानवाचा जयघोष करणारा फलक असावा, अशी आग्रही मागणी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर लावून धरली होती.

**प्रशासकीय समन्वय आणि कायदेशीर मान्यता**
या संदर्भात संघटनेने केवळ तोंडी मागणी न करता, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या कार्यालयात सविस्तर निवेदन सादर करून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. या पत्राची तातडीने दखल घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी *दयानंद गोरे साहेब* यांनी प्रशासनाला योग्य निर्देश दिले. त्यानुसार नगर अभियंता *प्रशांत जुन्नरे* यांनी भीम संस्कार ऑर्गनायझेशनला अधिकृत पत्राद्वारे (जा.क्र. संनपा/बांध/१४/१५७/२०२६) पुढील नियोजनाची अधिकृत माहिती दिली आहे.
**पूर्णकृती पुतळा आणि ‘संविधान भिंत‘ हे मुख्य आकर्षण**
नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित स्मारक परिसरात केवळ फलकच नाही, तर महामानवाचा एक देखणा **‘पूर्णकृती पुतळा‘** आणि भारतीय लोकशाहीची महानता दर्शवणारी **‘संविधान भिंत‘** उभारण्याचे ऐतिहासिक काम प्रस्तावित आहे. या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अंतिम टप्प्यात आहे. सध्या त्या ठिकाणी असलेला ‘I Love Sangamner’ हा बोर्ड केवळ सुशोभीकरणाचा एक तात्पुरता भाग असून, स्मारकाच्या मुख्य बांधकामाला सुरुवात होताच तो अत्यंत सन्मानपूर्वक दुसऱ्या योग्य ठिकाणी हलवण्यात येईल. त्याऐजी स्मारकाच्या सौंदर्यात भर घालणारा भव्य **‘I Love Ambedkar’** हा फलक प्राधान्याने बसवला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
**वैचारिक लढ्याला यश**
“संगमनेर शहराचा विकास ही आपल्या सर्वांचीच आनंदाची बाब आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे केवळ एक ठिकाण नसून ती लाखो अनुयायांची प्रेरणा आहे. त्या ठिकाणी महामानवाचा गौरव होणे ही लोकभावना होती. ना. बाळासाहेब थोरात आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन या भावनेचा पूर्ण सन्मान करेल, असा आम्हाला विश्वास आहे,” अशी भावना शशिकांत दारोळे यांनी व्यक्त केली.
या विधायक कार्यात शशिकांत दारोळे यांच्यासोबत *रामदास दारोळे (जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पॅंथर सेना), *राजूभाऊ खरात (शहर अध्यक्ष, दलित पॅंथर सेना संगमनेर), *प्रवीणभाऊ गायकवाड (नेते, दलित पॅंथर),* चेतन भाऊ दारोळे (सामाजिक कार्यकर्ते ) आणि *संतोष अभंग यांचा सक्रिय सहभाग आहे.


