ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

३ फेब्रुवारी रोजी होणार पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

१० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/ पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. १७ निर्भीड वर्तमान:-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ३ फेब्रुवारी, २०२४ रोजी महानगरपालिका विजय पार्क गार्डन, मथुरादास रोड एक्स्टेंशन, मखेचा हायस्कूल समोर, हेमू कॉलनी, कांदिवली (पश्चिम) येथे सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आलेले आहे.

 रोजगार मेळावा
रोजगार मेळावा

या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/ पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी वर नमूद पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त सुरवसे यांनी केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!