३१ डिसेंबर २०२२ व नुतन वर्ष स्वागत २०२३, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस सज्ज..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पुणे शहरात ३१ डिसेंबर व नुतन वर्षच्या स्वागतासाठी गर्दीची ठिकाणे व संवेदनशिल भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन पुणे पोलीस दला कडुन योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. नुतन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरात कॅम्प परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, चर्च या ठिकाणी लोक एकत्र येतात याकरीता मॉल्स, लॉजेस, ढाबे, हॉटेल्स, बस, रेल्वे स्टेशन, मंदिर, मस्जिद, पुतळे, धार्मिक स्थळे ई. चेक करण्यात येत आहेत. संशयित व्यक्ती, अभिलेखावरील गुन्हेगार चेक करुन योग्यती खबरदारी घेण्यात येत आहे.

३१ डिसेंबर व नुतन वर्षाच्या स्वागत बंदोबस्त दरम्यान कोठेही घातपाताची घटना घडणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे (विशेषतः महिलांची सुरक्षितता, स्नॅचिंग, पीक पॉकेटींग गुन्हयांना प्रतिबंध करणे) ही बंदोबस्ताची उद्दिष्टये निश्चित करण्यात आलेली आहेत.

पुणे शहरांतुन बाहेर जाणा-या व येणा-या मार्गावर पोलीस स्टेशन व वाहतुक शाखा यांचे संयुक्तपणे प्रभावी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वाहतुक शाखेकडुन मदय प्राशन करुन वाहन चालविणा-या विरुध्द व वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे यांचेवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गुन्हे शाखेकडुन चेन स्नॅचिंग, पॉकेटमार व महिलांच्या बाबत अपराध करणा-या इसमांवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे शहरमध्ये ३१ डिसेंबर व नुतन वर्षाच्या बंदोबस्ताचे अनुषंगाने पोलीस आयुक्तालयातून ०२, अपर पोलीस आयुक्त, ०५ पोलीस उप आयुक्त, ०७ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४० पोलीस निरीक्षक, १०० सपोनि /पोउपनि २५५० पोलीस अंमलदार असा मोठया प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच महत्वाचे व गर्दीच्या ठिकाणांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून (BDDS ) व श्वान पथकांकडून संपुर्ण घातपात विरोधी तपासणी करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी व महत्वाचे ठिकाणी जलद प्रतिसाद पथके (QRT) तैनात करण्यात आली आहे. तसेच काही आक्षेपार्ह माहीती मिळाल्यास नागरीकांनी तात्काळ पुणे शहर नियत्रण कक्ष फोन नंबर ०२०-२६१२६२९६ / ८९७५९५३१०० (व्हॉट्सअॅप नंबर), ११२ या वर संपर्क करण्याचे अवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version