ताज्या घडामोडीपुणे

२,२०,०८,००० /- रुपये किंमतीचे ०१ किलो ०८१ ग्रॅम कोकेन सह रेकॉर्डवरील नायजेरीयन आरोपीस केले जेरबंद..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ असे कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना स्टाफ मधील अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील नायजेरियन फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई, (Folarin Abdulazees Andoyi) उंड्री मंतरवाडी परिसरात कोकेन या अंमली पदार्थ विक्री करीत आहे.

मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने उंड्री येथील चौकातुन मंतरवाडीकडे जाणारे रोडवरील आर पॉईन्ट सोसायटीचे समोर सार्वजनिक रोडवर रेकॉर्डवरील नायजेरीयन फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई, (Folarin Abdulazees Andoyi) हा त्याचेकडील कार घेवुन संशयितरीत्या उभा असलेला दिसला. पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफने छापा कारवाई करुन नायजेरीयन इसम नामे फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई, (Folarin Abdulazees Andoyi) वय ५० वर्षे, सध्या रा. शकुंतला कानडे पार्क, सर्व्हे नंबर २८/२ बी-१ विंग ११ मजला फ्लॅट नंबर ११०४ उंड्री पुणे मुळ रा. नायजेरिया यांस ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली, त्याचे ताब्यात एकुण २,२०,०८००० /- रुचा ऐवज त्यामध्ये ०१ किलो ८१ ग्रॅम कोकेन कि रु २,१६,२०,०००/- चा सहा मोबाईल फोन कि रु १६०००/- चे एक कारकिरु ३०,००००/- ची दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे कि रु २०००/- रोख रुपये ७०,०००/- असा ऐवज व कोकेन हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याबाबत पो हवा प्रविण उत्तेकर यांनी कोढंवा पो स्टे येथे दिलेल्या तक्रारी वरुन फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई, (Folarin Abdulazees Andoyi) यांचे विरुध्द एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीवर यापुर्वी चुतश्रृंगी पोलीस ठाणे येथे कोकेन या अंमली पदार्थाचे तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल असुन नुकताच तो येरवाडा कारागृहातुन जामीनावर मुक्त झाला होता तसेच कस्टम विभागाने सुध्दा त्याचेवर यापुर्वी कारवाई केली होती.

सदर कारवाई ही श्री अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, श्री.रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री गजानन टोम्पे मा.सहा पो आयुक्त, गुन्हे १, यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक,१ गुन्हे शाखा पुणे शहर कडील श्री. विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जोशी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!