१,१२,००,०००/- किंमतीचा २८० ग्रॅम वजनाचा ‘हेरॉईन’अंमली पदार्थ मुंबई पोलीसांकडून जप्त..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा

मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई सो. यांचे आदेशान्वये मुंबई व मुंबई उपनगरामध्ये अंमली पदार्थाची तस्करी तसेच खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि, मुंबई यांचेकडुन कडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली युनिट मुंबई येथील प्रभारी पोलीस निरीक्षक रूपेश नाईक व पथक हे गोरेगांव (पू), मुंबई परिसरात गस्त करीत असताना, कुमार पान भांडार दुकानाच्या समोर, सवेरा हाईटस जवळ, बी. एम. सी. कॉलनी, अब्दुल रशीद रोड, मालवणी गेट नं. ०५, मालाड (प.), मुंबई या ठिकाणी दोन इसम त्यांचे हातात काळ्या रंगाची प्लॅस्टिक कॅरीबॅग घेवून संशयास्पदरित्या उभे असल्याचे दिसुन आले. गस्ती पथकास पाहताच दोन्ही इसम तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पथकाने त्यांना घेराव घालुन शिताफीने ताब्यात घेतले. दोन्ही इसमांची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता एका इसमाचे ताब्यात १५० ग्रॅम ‘हेरॉईन’ व दुसऱ्या इसमाचे ताब्यात १३० ग्रॅम ‘हेरॉईन’ असा एकुण २८० ग्रॅम वजनाचा ‘हेरॉईन’ अं. रू. १, १२,००,०००/- किंमतीचा अंमली पदार्थ मिळून आला. त्यानुसार दोन्ही इसमांच्या विरुध्द अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गु.र.क्र. १८६ / २२, कलम ८ (क) सह २१ (क), २९ एन.डी.पी. एस. कायदा १९८५ प्रमाणे वाणिज्य स्वरुपाचा (Commercial Quantity ) गुन्हा नोंद करण्यात येवून रितसर अटक करण्यात आली.

जप्त मुद्देमालाचे वर्णन :-

२८० ग्रॅम ‘हेरॉईन’ हा अंमली पदार्थ (कि.रु. १,१२,००,०००/- आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत) सदर इसमांकडुन जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ बाबत अधिक तपास करून त्याचे पुरवठादाराचा शोध सुरू आहे.

अटक आरोपीतांना रिमांडकामी मा. न्यायालयात हजर करण्यात येत असून सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. आडकर हे करीत आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी मा. विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई), मा. सुहास वारके, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मा. प्रकाश जाधव, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई, मा. किरण लोंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई (अति. कार्यभार ) यांच्या मार्गदर्शनाखाली अं.प.वि.कक्ष, कांदिवली युनीटचे प्र. पो. नि. रुपेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली, पो.उ.नि. आडकर, पो.ह. पेंढारकर, पो.ह हडकर, पो.मोहिते,पो. पवार, पो.ना.चा. ठोंबरे, पो.शि.चा.कानडे यांनी केलेली आहे.

Exit mobile version