ताज्या घडामोडी

०६ नेपाळी बालकामगारांसह एकुण ०७ बालकांची बालकामगारितून मुक्तता.!!.

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- विशेष बाल पोलीस कक्ष (SJPU), गुन्हे शाखा, मुंबई यांना नागपाडा परिसरात लहान मुले बालकामगार म्हणून काम करत असल्याची माहिती कामगार आयुक्त कार्यालय व प्रथम या स्वयंसेवी संस्थेकडून प्राप्त झाली होती.

विशेष बाल पोलीस का (SJPU) यांनी सरकारी कामगार अधिकारी व स्वंयसेवी संस्था यांच्या मदतीने २२/९७ के मामसा इस्टेट, मदनपुरा, नागपाडा, मुंबई. ८ येथील खालील दिलेल्या एकुण तीन आस्थापनांवर छापा कारवाई करून आस्थापनेमध्ये बॅग बनविण्यासाठी रेझीन कटींग करण्याचे काम करीत असलेल्या एकुण ०७ बालकांची बालकामगारितून मुक्तता करण्यात आली.

आस्थापना क्रमांक १ :- पोटमाळा, पहिल्या मजल्यावर जमशेद बॅग कारखाना, येथे ०१ अल्पवयीन बालकाची बालकामगारितून मुक्तता करण्यात आली.

आस्थापना क्रमांक २ :- पोट मजला, दुसऱ्या मजल्यावर एकुण ०३ अल्पवयीन बालकांची बालकामगारितून मुक्तता करण्यात आली. व आस्थापनेचा मालक जमशेद अब्दुल शेख, वय ३९वर्षे यास अटक करण्यात आली आहे.

आस्थापना क्रमांक ३ :- आफताब बॅक कारखाना, उमर मजीद जवळ, मदनपुरा, नागपाडा, मुंबई ८ या आस्थापनेतील एकुण ०३ अल्पवयीन बालकांची बालकामगारितून मुक्तता करण्यात आली असून आस्थापनेचा मालक मोहम्मद अफताब नूर मोहम्मद अन्सारी, वय २८ वर्षे यास अटक करण्यात आले.

या बाबत नागपाडा पोलीस ठाणे येथे वि. स्था. गुरक. १८/२०२३ कलम ७५, ७९ बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईमध्ये एकुण ०७ बालकांची बालकामगारितून मुक्तता करण्यात आली असून मुक्त केलेल्या मुलांपैकी ०६ मुले ही नेपाळ देशातील आहेत. सर्व मुलांना बाल कल्याण समिती समक्ष हजर करण्यात येवून त्यांना काळजी व संरक्षणकामी मांटूगा बालगृह येथे ठेवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!