स्वारगेट पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

परराज्यातुन ५४ लाखचा मुद्देमाल जप्त

निर्भीड  वर्तमान :– पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. १३७/२०२४ भा.द.वि. कलम ३८१,४११,३४ मधील फिर्यादी यांनी व्होडाफोन कंपनीचा लाईनकार्ड चोरी केली बाबत दि. १६/०४/२०२४ रोजी वेगासेंटर चौक स्वारगेट येथील व्होडॉफोन कंपनीच्या ऑफीस मधुन ५४,५४०००/- रु. चे लाईनकार्ड चोरी चोरुन नेले बाबत तक्रार दिल्याने वर नमुद गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास व दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे बाबत वरिष्ठांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश केले होते.

त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी वेगा सेंटर चौक स्वारगेट येथील ऑफीस व परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्क आऊट करुन तसेच सदर कंपनी मध्ये काम करणारे कामगार यांचेकडे कसुन चौकशी करुन सदर लाईनकार्ड हे तेथील कामगारांनी चोरी केले बाबत समजले असता सदर ठिकाणी काम करणारे १) भरमुबिरप्पा पुजारी वय ३९ वर्षे धंदा सिक्युरिटी गार्ड रा. गुरूकृपा बिल्डींग रुमनं ०३ लिपाणे वस्ती जांभुळवाडी रोड कात्रज पुणे २) दिपक मुरलीधर तडके वय ४८ वर्षे धंदा टेक्नीशियन रा. शांती रक्षक सोसायटी सी विंग फ्लॅट नं ४७, नागपुर चाळ येरवडा पुणे यांनी सदर लाईनकार्ड हे आरोपी नामे ३) प्रितमकुमार कामताप्रसाद कमल वय ३२ वर्षे धंदा केबलिंग रा. रोहिदास निवास पहिला मजला कोल्हेवाडी खडकवासला पुणे यांना दिल्याचे निष्पन्न झाले असुन सदर लाईन कार्ड हे दिल्ली येथुन ताब्यात घेवुन पंचासमक्ष जप्त करुन दाखल गुन्हा उघड करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्रीमती नंदिनी वग्यानी यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप फुलपगारे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उप निरीक्षक येवले व पोलीस अंमलदार संदीप घुले, सोमनाथ कांबळे, अनिस शेख, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दिपक खंदाड, प्रविण गोडसे यांनी केलेली आहे.

Exit mobile version