स्वारगेट पोलीसांनी प्रवाशांचे दागिणे चोरी करणाऱ्या चोरास काही तासात केले जेरबंद

पुणे दि.२४ निर्भीड वर्तमान:- स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरटयाने तक्रारदार शिंदे यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी केली होती. त्यावरुन शिंदे यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात करून तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशनचे तपास पथक यांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला होता.

स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड

स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपासपथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील अंमलदार पोशि कांबळे व पोशि शेख यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड येथे जावुन तेथिल सीसीटीव्ही फुटेज चेक करुन त्या आरोपीचा शोध घेत असतांना, स्वारगेट एस.टी. स्टँड येथे आरोपी संतोष रामकृष्ण शंकपाळ हा संशयीत्या फिरत असताना पोलिसांना दिसला पोलिस त्याचे दिशेने जाताच तो पळुन जावु लागल्याने पोलीसांनी शिताफीने त्याचा पाठलाग करुन त्याला घेराव घालुन आरोपी संतोष शंकपाळ याला ताब्यात घेतले आणी पळुन जाण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागल्याने त्याची अंगझडती घेतली तर त्याचे पॅन्टच्या  खिशात एक अर्धवट तुटलेली सोन्याची चैन मिळुन आली म्हणुन त्यास पोलीस ठाणेस आणुन त्यानंतर त्याचेकडे कसुन चौकशी केलयानंतर त्याने चेन स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड येथेच चोरी केल्याचे कबुल केले.

अश्याप्रकारे पोलिसांच्या तात्काळ कारवाई मुळे स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड प्रवाशांची गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणार चोर काही तासात जेरबंद करण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनचे तपास पथकाला यश आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर. मा.श्री. स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर. मा. श्रीमती नंदिनी वग्यानी साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निरीक्षक श्री सुरेशसिंग गौड, श्रीमती संगीता पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री.प्रशांत संदे, पोलीस उप- निरीक्षक प्रतापसिंह शेळके, पो.हवा. विजय कुंभार, पो.हवा. मुंढे, पो.ना. देवकाते, सोमनाथ कांबळे, सुजय पवार, शिवा गायकवाड, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, अनिस शेख, प्रविण गोडसे, दिपक खंदाड, संजय मस्के, यांनी एकत्र मिळुन केली आहे.

Exit mobile version