स्पा सेंटरवर छापा टाकुन सामाजिक सुरक्षा विभागाने पिडीत महिलेची केली सुटका..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- डेला थाई स्पा, सर्वे नं ६, हिस्सा नं २ / १ ( प्लॉट नं २/११), चंदननगर,पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असलेबाबत गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी यांना प्राप्त झाली होती.

मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी बनावट गि-हाईक पाठवुन खात्री केली असता, मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने, सदर ठिकाणी तात्काळ छापा टाकुन त्याठिकाणावरून एकुण ०१ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.तर मसाज पार्लर मधून मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण २०,०००/- रू. ( वीस हजार रूपये) चा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्पा मॅनेजर याला ताब्यात घेवुन व पाहिजे आरोपी स्पा चालक असे दोन इसमांविरूध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. १९४/ २०२३ भादविक ३७०,३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, आरोपी व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता चंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्रीरामनाथ पोकळे,, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,भरत जाधव तसेच सहा. पोलीस निरीक्षक, अश्विनी पाटील, सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, रेश्मा कंक, ओंकार कुंभार या पथकाने यशस्वी केली आहे.

Exit mobile version