सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडुन स्पा सेंटरवर छापा टाकुन ०४ पिडीत मुलींची सुटका..!!

मसाज पार्लर नावाखाली सर्रास देहव्यापार सुरू..

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा

सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडुन स्पा सेंटरवर छापा टाकुन ०४ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.

स्पंदन स्पा, बालेवाडी रोड, बाणेर, पुणे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असले बाबत गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे प्राप्त झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी मसाज सेंटर मध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळुन आल्याने तात्काळ छापा कारवाई करून सदर ठिकाणावरून एकुण ०४ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

स्पा मालका विरूध्द चतुःशृंगी पोलीस स्टेशन येथे गुरनं ५५२/२०२२ भादवि ३७०,३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी स्पा मालक व पिडीत महिलांना पुढील कारवाई करीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. अमोल झेंडे मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार अजय राणे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.

Exit mobile version