सामाजिक सुरक्षा विभाग कडून रविवार पेठ परिसरात प्रतिबंधित मांजा साठवणुक करुन विक्री करणा-यांवर छापा कारवाई..!!

प्रतिबंधीत नायलॉन मांजाचे २४ रील, रुपये १७,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करुन व ०१ आरोपी यांचेवर गुन्हा दाखल..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दि. ०९/०१/२०२२ रोजी रविवार पेठ परिसरात प्रतिबंधित मांजा साठवणुक करुन विक्री करत असलेबाबत गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना प्राप्त झाली. मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा घरामध्ये साठवणुक करुन विक्री चालु असल्याचे बाबत खात्री केल्यानंतर तात्काळ छापा कारवाई करून प्रतिबंधीत नायलॉन मांजाचे २४ रील, रुपये १७,००० /- कि.चा मुद्देमाल जप्त करुन एका आरोपी विरूध्द खडक पोलीस स्टेशन येथे भादवि १८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व मुददेमाल कारवाई करीता खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई श्री. रितेश कुमार मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. अमोल झेंडे मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विजय कुंभार तसेच, सपोनि अनिकेत पोटे, सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार अजय राणे, आण्णा माने, राजेद्र कुमावत, नदाफ, पठाण, कांबळे यांचे पथकाने यशस्वी केली आहे.

Exit mobile version