सामाजिक सुरक्षा विभागाने केली गावठी हातभट्टी दारूसाठयावर कारवाई

तीन आरोपी अटक तर ३,०४,६५०/- रूपये रू किचा मुद्देमाल केला जप्त.

वर्तमान टाइम्स । वृत्तसेवा :- दि. २७/०२/२०२३ रोजी शिंदेवणे काळेश्वर गाव राठोड वस्ती, उरुळी कांचन, येथे गावठी हातभट्टी दारु विकत असलेबाबत गोपनिय माहिती आपल्या बातमीदारामार्फत सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी याना मिळाली होती.

त्याअनुशंगाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागा गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, विनापरवाना बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी साठवुन ठेवलेली एकुण २,७५० लिटर ३,०२,५००/- रु किची गावठी हात भट्टीची दारू व रोख रक्कम २,१५०/- रूपये असा एकुण ३,०४,६५०/- रू किचा मुद्देमाल मिळुण आला,तर एकुण तीन आरोपी विरूध्द लोणी काळभोर गुरनं. १७२/ २०२३, महाराष्ट्र प्रोव्हि.कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, त्यांना पुढील कारवाई करीता लोणी-काळभोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे व अमित जमदाडे या पथकाने केली आहे.

Exit mobile version