सामाजिक सुरक्षा विभागाची दोन जुगार अड्डयावर धडक कारवाई..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- गोसावी वस्ती, हडपसर व सातवनगर, वानवडी या परीसरात काही जण बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत असलेबाबत गोपनिय बातमीदारामार्फेत सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी यांना माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस हवलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही जण बेकायदेशीरपणे मटका जुगार पैसे लावुन खेळत असल्याचे मिळुन आल्याने २७ इसमांविरूध्द कारवाई करून रोख २७,९३०/- रू. व १,२१,०००/- रू. कि. चे मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण १,४८,९३० रू. कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले २७ जण व दोन पाहिजे आरोपी यांच्यावर हडपसर व वानवडी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर व वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. अमोल झेंडे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ या पथकाने यशस्वी केली आहे.

Exit mobile version