सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार अड्डयावर छापा ११ इसमावर कारवाई, ४२,७९०/- किंमताचा मुद्देमाल जप्त..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- चंदननगर पुणे परीसरात उघडया पत्र्याचे शेड मध्ये काही व्यक्ती जुगार खेळत असलेबाबत खात्रीशीर बातमी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार त्याठिकानी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने १० इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण ४२,७९०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे आरोपी अशा ११ इसमांविरूध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं २५/२०२३, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता चंदननगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.

Exit mobile version