समता सैनिक दलाचा चर्चा व परिसंवाद कार्यक्रम भडगाव येथे संपन्न

सामाजिक परिवर्तनासाठी समता सैनिक दल सज्ज - किशोर डोंगरे

भडगाव दि. 9 निर्भीड वर्तमान:- समता सैनिक दल (संस्थापक:- विश्वभुषण डॅा.बाबासाहेब आंबेडकर) या दला तर्फे शासकीय विश्राम गृह भडगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे “समता सैनिक दल हे खरे आंबेडकरी मिशन” या विषयावर चर्चा व परिसंवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक आयु. किशोर डोंगरे हे उपस्थित होते. सैनिकांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटना पुनश्च उभ्या करणे आणि त्यांचे तत्वज्ञानाची देशात पुनर्स्थापना करणे हे आम्हा भारतीयांचे कर्तव्य आहे.

समता सैनिक दल

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीतून सर्व भारतीयांच्या उन्नतीचा सन्मानाने जगण्याचा अधिकार निर्माण केला आहे. देशात लोकशाही व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून कठोर भूमिका घेतली. त्याची फळे आपण सर्व भारतीय चाखत आहोत. परंतु या महामानवाने निर्माण केलेले मानवतावादी तत्वज्ञान आपण विसरून गेलो आहोत.आज ही त्यांनी निर्माण केलेल्या संघटनांची देशाला, सर्व सामान्य व्यक्तीला आवश्यकता आहे, त्यासाठी या संघटना पुनश्च उभारणे ही काळाची गरज आहे. म्हणून या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

समता सैनिक दल

या माध्यमातून समता सैनिक दलाचे ध्येय धोरणाची ओळख व्हावी आणि या संघटनेचा प्रचार प्रसार करून दलाची उभारणी करणारे कार्यकते तयार करणे हा या मागील उद्देश आहे. विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या चळवळीसाठी काम करणान्या कार्यकत्यांची फळी उभी करणे हा देखील आमचा उद्देश आहे.

सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती उपजिल्हा प्रचारक पिंटू सावळे, आरुण खरे व पाचोरा तालुका प्रचारक शांताराम सपकाळे हे होते तर आयोजक भडगाव तालुका प्रचारक विजय मोरे, रामजी जावरे,वाल्मीक मोरे,जनार्दन जावरे, सतिष मोरे हे होते.

या कार्यक्रमात युवराज मोरे,(गोंडगाव ) शंकर खैरे,(शिवणी) निलेश खैरे (शिवणी) हेमराज पवार,( भडगाव ) गोकुळ कोळी,( बास्तर)भगवान भिल्ल, (बास्तर) यांनी समता सैनिक दलात प्रवेश केला तर उपस्थिताचे आभार भडगाव तालुका प्रचारक आयु.विजय मोरे यांनी मानले.

Exit mobile version