ताज्या घडामोडीराजकीय

सन्मान पूर्वक संधी दिली तर सोबत..! नाहीतर उमेदवार उभे करणार

मुंबई :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने महाविकास आघाडी चे वरिष्ठ नेते यांच्या समवेत विधानसभा संबंधित भेट घेऊन चर्चा करण्यात आली यावेळी बाळासाहेब पवार महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली रिपाईचे शिष्ट मंडळ यांनी आपले निवेदन महाविकास आघाडी वरिष्ठ नेते यांना सादर केले आहे.

महाविकास आघाडीचे नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच काँग्रेसचे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष यांना भेटून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

सदर शिष्टमंडळचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, प्रदेश सचिव अशोक ससाने, प्रदेश संघटक कैलासजी जोगदंड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात, कार्यालयीन प्रमुख महाराष्ट्र राज्य तानाजी मिसळे, मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रशांत भाऊ तोरणे,मुंबई संघटक नितीन जाधव, रमेश भोईर, प्रसाद केळशीकर, विद्यार्थी आघाडीचे अभय भोसले, इत्यादी प्रमुख पदाधिकारी शिष्टमंडळात होते याबाबत खासदार अनिलजी देसाई यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!