ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ धुळफेक – रेखा ठाकूर

जो पर्यंत वंचित बहुजन आघाडीला अधिकृत आमंत्रण येत नाही किंवा जागा वाटपाच्या चर्चेत बोलावत नाहीत, तो पर्यंत बातम्या तथ्यहिन

मुंबई दि. 10 निर्भिड वर्तमान:- शिवसेना (उ.बा.ठा) चे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल पत्रकार परिषद (press conference) घेऊन वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्याचे जाहीर केले आहे. हे निव्वळ धूळफेक आहे. असे स्पष्टीकरण वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी प्रसिद्ध पत्रक काढून स्पष्ट केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धपत्रकवंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धपत्रक

दि. 9 जानेवारी 2024 ला दिल्लीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीची कल्पना आम्हाला होती असे रेखा ठाकूर म्हटल्या आहेत.

वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या सूत्रांकडून कालच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबद्दल चर्चा झाल्याचे समजले. पण काय निर्णय निश्चित झाला ते समजलेले नाही.

आणि जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला अधिकृत आमंत्रण येत नाही किंवा जागा वाटपाच्या चर्चेत बोलावत नाहीत, तोपर्यंत ह्या बातमीत काहीही तथ्य नाही असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धपत्रका (press release) मार्फत जाहीर केले आहे.

वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचीच आहे आणि त्यासाठी इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याचा शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करू असे प्रतिपादन रेखा ठाकूर प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!