शिवाजीनगर पोलीसांकडून जबरी चोरीचा गुन्हा दोन तासात उघड..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दिनांक १८/१२/२०२२ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर येथे जबरी चोरी बाबत गुन्हा रजि.नं. १९९/२०२२ भादवि कलम ३९२,१७०,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, भोलेनाथ अहिवळे हे पोलीस पथकासह घेत असताना, सहा.पोलिस फौज अविनाश भिवरे यांना आपल्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्हयातील जबरी चोरी करणारे इसम हे शनी मंदिर, वडारवाडी येथे थांबले आहेत.

बातमीच्या ठिकाणी बातमीदाराने सांगितलेले वर्णनाचे हे मिळून आले त्यांचे नाव श्रीकांत भरत कदम, वय ३२ वर्ष, आणि सुरज राजु धोत्रे, वय-३२ वर्ष,  यांना पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले व त्यांना विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांने दाखल गुन्हा केलेचे कबुल केले आहे.

सदर आरोपीकडुन दाखल गुन्हयातील फिर्यादी आणि त्यांचे कामगार मित्र यांचे जबरीने चोरुन नेलेले चार मोबाईल फोन, रोख रक्कम आधार कार्ड आणि गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण ६५,५००/- किंचा मुददेमाल ताब्यात घेवुन शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हा रजि.नं.१९९/२०२२ भादवि कलम ३९२ १७०, ३४ हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा शहर (अति. कार्यभार पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर), मा. पोलीस उपायुक्त, परि- ०१. पुणे शहर, श्री. संदीपसिंह गिल्ल मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर, श्री. सतीश गोवेकर तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे). विक्रम गौड, सहा.पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलिस उप-निरिक्षक, अर्जुन नाईकवाडे, पोलीस अंगलदार, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, सुरेंद्र साबळे, सतीश खुरंगे, आदेश चलवादी यांनी केलेली आहे..

Exit mobile version