व्हिसा नियमांचे उल्लंघन करणा-या परदेशी देशाच्या महिलेवर FRO शाखेतर्फे हद्दपारीची कारवाई

वर्तमान टाइम्स वृत्तसेवा :- पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत परकीय देशाची महिला परकिय नागरिक टूरिस्ट व्हिसावर येवून नोकरी करत असल्याची गोपनीय माहिती परकिय नागरिक नोंदणी शाखा, पुणे शहर या कार्यालयास (FRO, PUNE CITY) मिळाल्याने वरिष्ठांचे मागर्दशानाखाली परकिय नागरिक नोंदणी पथकाने विमानतळ पोलीस ठाणेचे हद्दीतील एका खाजगी मसाज पार्लरवर जाऊन दि.१५/०२/२०२३ रोजी तपासणी केली होती.

पार्लर मध्ये एक परदेशी देशाची महिला ही सन २०२२ मध्ये टूरिस्ट व्हिसावर भारतात आली होती व नोकरी करण्याचा वैध व्हिसा नसताना देखील मसाज पार्लर मध्ये नोकरी करत असल्याचे आढळून आल्याने त्या महिलेस ताब्यात घेवून शासकिय महिला सुधारगृह, मुंढवा, पुणे येथे निगराणीखाली ठेवण्यात आले होते आणि तीचे विमान तिकीट तात्काळ आरक्षित करुन दि.२६/०२/२०२३ रोजी सदर महिलेस मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे नेवून तीचेवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली व तीचे मूळ देशात पाठविण्यात आले आहे.

तर या महिलेला काळया यादीत समाविष्ट करणेचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला असून, महिलेस भारतात परत प्रवेश मिळणार नाही.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मागर्दशनाखाली परकिय नागरिक नोंदणी शाखा, पुणे शहरच्या (FRO, PUNE CITY) पथकाने केली आहे.

Exit mobile version