व्याजाच्या पैशांच्या बदल्यात खंडणी मागणा-या सावकारांच्या आवळल्या मुसक्या..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- खंडणी विरोधी पथक १ कडे बुधवार पेठ येथील कापड व्यापारी यांनी घेतलेल्या व्याजाची मुद्दल व व्याज परत करूनही ज्यादा दराने व्याजाची मागणी करीत असल्याचे आणी ते न दिल्यास त्यांना व त्यांचे कुटुंबियाला मारहाण व शिवीगाळ करीत असल्याबाबतचा तक्रारी अर्ज चौकशीसाठी प्राप्त झाला होता.

अर्जाच्या चौकशीमध्ये रविंद्र कांबळे व इतर २ व्यक्तीकडून ७,००,०००/- रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात व्यापा-याने त्यांना एकूण १३,६२,०००/- रुपये मुद्दल व व्याजाचे पैसे देवून सुध्दा ते तिघेही आणखी १३,५०,०००/- रुपये ऐवढया व्याजाची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी रविंद्र कांबळे व इतर २ इसम यांचे विरुध्द विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गु.र.नं. ४१/२०२३ भादंवि कलम ३८४,३८६, ५०४, ५०६, ३४ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ व ४५ अन्वये गुन्हा नोंद करून गुन्हयातील आरोपी नामे रविंद्र पिरप्पा कांबळे यास ताब्यात घेवून पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त १ गुन्हे श्री. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सपोनि अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार मधुकर तुपसौंदर, हेमा ढेबे, रविंद्र फुलपगारे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, अमर पवार व संभाजी गंगावणे यांनी केली आहे.

Exit mobile version