विधिसंघर्षित बालक ताब्यात घेऊन 03 मोबाईल केले जप्त

बंडगार्डन पोलीस स्टेशनची कामगिरी

पुणे दि. २३ निर्भीड वर्तमान:- मोटरसायकल वरुण रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरला बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतला आहे.

बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी पो.उप.निरी रविन्द्र गावडे व कर्मचारी पो. ना. सरवदे, पवार हे पेट्रोलिंग करत असताना पो.शि.ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना आपल्या गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली कि, चोरी करून मोबाईल विकन्यासाठी एकजन पाचबिल्डिंग ताडीवाला या ठिकाणी येणार आहे.

मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून एका विधीसंघर्षित मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असलेल्या मोबाईलची विचारपूस केली तर त्याने ते मोबाईल फोन मोटरसायकल वरून खेचून चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून या गुन्हया व्यतिरिक्त अजून  2 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. त्याबाबत अधिकचा तपास सुरू आहे.

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील  मॅडम, साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन संदीपान पवार , पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पो. हवा सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, पो.शि ज्ञाना बडे, संजय वणवे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

Exit mobile version