क्राइमताज्या घडामोडीपुणे

वाहनचोरी मधील सराईत आरोपीस केले जेरबंद, ०४ गुन्हे उघड

पुणे दि. 12 निर्भीड वर्तमान:- पुणे शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट-६ कडील पोलीस अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना, पोलीस अंमलदार, सकटे व मुंढे यांना आपल्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाहनचोरी मधील सराईत आरोपी स्वप्नील व्हणमाने हा सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळ काळेपडळ येथे रोडवर उभा आहे व त्याच्या जवळ असलेली गाडी चोरीची आहे.

मिळालेली बातमी आपल्या वरिष्ठ अधिकारी यांना कळवून सूचनेप्रमाणे तात्काळ युनिट-६ कडील अंमलदार हे हडपसर भागात पुणे सासवड रोडवर जावुन बातमीतील व्हणमाने याचा शोध घेऊन त्याला त्याच्या जवळ असलेल्या मोटार सायकलसह ताब्यात घेतले व त्याच्याकडे असलेली मोटार सायकलच्या कागदपत्रांची विचारपुस केली तर तो पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे देवून कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याने, मोटार सायकल चोरीची असल्याची खात्री झाल्याने स्वप्नील व्हणमाने यास अटक करण्यात आली.

आरोपी स्वप्नील व्हणमानेकडे अधिक तपास करतांना, त्याचेकडुन हडपसर पोलीस स्टेशन येथील दोन तर, सिंहगड पोलीस स्टेशन व शिक्रापुर पोलीस स्टेशन येथील प्रत्येकी एक असे एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १,१५,०००/- रुपये किंमतीची वाहने जप्त केली आहेत. त्याच्यावर सोलापुर याठिकाणी वाहन चोरीच गुन्हे दाखल आहेत. पुढील कार्यवाही कामी आरोपीतास हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२, पुणे, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक, श्री. उल्हास कदम, पोलीस अंमलदार, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, महेंद्र कडु, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!