वारजे माळवाडी सर्व पक्षीय कृतीसमीती कडून करणी सेनेचे प्रमुख सेंगर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी देण्यात आले निवेदन..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- दोन दिवसांपूर्वी करणी सेना प्रमुख अजय सेंगर यांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ बद्दल जाणून बुजून भीमा कोरेगाव चे वातावरण दूषित करण्यासाठी व समाजामध्ये तेड निर्माण होऊन जातीय दंगल घडावी असे बेताल वक्तव्य केल्यामुळे सेंगर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणी करता फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व पक्ष संघटनेच्या कृती समिती च्यावतीने वारजे पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय गलांडे मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके साहेब यांना निवेदन देण्यात आले.

त्यावेळी कृती समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर भोरकडे मास्तर वंचित युवा नेते अजय भाऊ भालशंकर रिपाई युवक आघाडीचे सरचिटणीस निलेश भाऊ आगळे, रिपाई हवेली अध्यक्ष संजयभाऊ धिवार, स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांतभाऊ दारोळे, रिपाई संघटक अरविंद शिंदे, पुणे शहर सचिव दत्ता चव्हाण ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष नानाभाऊ ओहाळ राष्ट्रीय सचिव बापूसाहेब लष्करे बहुजनी भिमसेना अध्यक्ष अश्विन भाऊ ढगे रिपाई श्रमिक ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश भाऊ सोनवणे सचिव दशरथ भाऊ मोरे श्रमिक ब्रिगेड उपाध्यक्ष किशोरभाऊ पंडागळे, अंकुश सोनवणे यदि कार्यकर्ते उपस्थित होते

Exit mobile version