क्राइमताज्या घडामोडीपुणे

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची मोठी कारवाई ५ आरोपींकडून केले ४३ दुचाकी वाहने जप्त.

वर्तमान टाइम्स वृत्तसेवा :- पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या दुचाकी चोरींच्या घटनांवर अंकुश ठेवण्याकरीता दुचाकी करणारे आरोपींचा शोध घेऊन वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याकरीता मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे तपास पथकातील सपोनि. संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथकातील अंमलदार यांना वाहन चोरी गुन्हे करणारे आरोपींचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे सपोनि.संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाची वेगवेगळी पथके तयार करुन दुचाकी चोरी करणारे गुन्हेगारांची माहीती काढण्यास सुरुवात केली होती सपोनि संतोष पाटील यांना त्यांच्या विश्वासु बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, तापकीर मळा चौक येथे एक मोटार सायकल चोर हा चोरीची मोटार सायकल विक्री करीता येणार आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व त्यांचे पथक यांनी सापळा रचून संशयीत नितीन राजेंद्र शिंदे, वय २० वर्षे, यास त्याचे ताब्यातील होडा शाईन मो.सा. नं. एमएच २४ एएच १५२० सह शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचेकडे तपास करता त्याचेकडे मिळालेली मोटार सायकल ही त्याने रहाटणी भागातून चोरी केली असल्याचे व त्याबाबत वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २३२ / २०२३ भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे उघडकीस आले.

त्यामुळे त्याला अटक करुन त्याचेकडे अधिक तपास करुन त्याचा साथीदार व मुख्य सुत्रधार आरोपी केशव महादेव पडोळे वय २५ वर्षे याचेसह त्यांचे इतर साथीदार १) नवनाथ सुरेश मुटकुळे वय २४ वर्षे २) ऋषीकेश अजिनाथ भोपळे वय २३ वर्षे, ३) अमोल दगड पडोळे वय २४ वर्षे यांना वेगवेगळया ठिकाणावरुन पकडुन त्यांना अटक करण्यात आले आहे.

त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास करुन त्यांचेकडुन वाकड पो.स्टे. हद्दीतील एकुण १४, हिंजवडी पो.स्टे. हद्दीतील ०४, बारामती तालुका पो.स्टे. हद्दीतील ०७, राजणगाव पो.स्टे. हद्दीतील ०३ गुन्हे, अहमदनगर कॅम्प पो.स्टे. हद्दीतील ०२, बारामती शहर, वाळुंज एमआयडीसी, पाथर्डी, कोतवाली, कर्जत, श्रीगोंदा पो.स्टे. कडील प्रत्येकी ०१ असे एकुण ३६ गुन्हे केल्याचे उघडकीस आणले असून गुन्हयातील ३६ मोटर सायकल व इतर ०७ चोरीच्या मोटार सायकल अशा एकुण ४३ चोरीच्या मोटर सायकल मिळुन किं. रु. २१.५० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आलेला आहेत.

गुन्हयाचे तपासामध्ये असे दिसुन आलेले आहे की, आरोपी मोटर सायकल चोरुन त्या परजिल्हयात विकत होते व काही नागरीक मोटर सायकलचे कागदपत्रांची पडताळणी तसेच सत्यता न तपासता स्वस्तामध्ये मिळतात म्हणुन चोरीच्या मोटर सायकल विकत घेत आहेत. चोरीच्या मोटार सायकल आहेत हे माहित असतानाही ते विकत घेतल्यामुळे गुन्ह्यात भादंवि कलम ४११ चा अंतर्भाव करुन एकुण १७ इसमांवर कारवाई करण्यात येत आहे.

त्यामुळे नागरिकांना पोलीसांकडून आवाहन करण्यात आलेले आहे की, नागरिकांनी दक्ष व जागरुक राहुन मोटर सायकलचे कागदपत्रांची पडताळणी तसेच सत्यता न तपासता कोणतेही वाहन विकत घेवु नये तसेच कोणी अशा प्रकारे कागदपत्रे नसताना मोटर सायकल विकत असल्याबाबतचा प्रकार निदर्शनात आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज लोहीया, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त, परि- २, पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे-१, मा. श्री. रामचंद्र घाडगे, पोलीस | निरीक्षक गुन्हे – २, सपोनि. संतोष पाटील, सपोनि. संभाजी जाधव, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफौ. विभीषण कन्हेरकर, सपोफी. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संतोष बर्गे, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि कौतेंय खराडे, पोशि भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, पोशि. रमेश खेडकर, पोशि सागर पंडीत (परि- ०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!