वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशाने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

मुंबई निर्भीड वर्तमान:- बोरीवली पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व पोलीस उप निरीक्षक यांनी गुन्हातील तपासात मदत करतो म्हणून पीडित महिला तक्रारदार कडून ५,००,०००/- ची लाचेची मागणी करून काही रक्कम घेतली होती म्हणून त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार न्यायलायाच्या आदेशाने लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे.

 

या प्रकरणातील महिला फिर्यादीयांनी दिलेल्या तक्रारीवरून बोरीवली पोलीस ठाणे येथे महिला फिर्यादी यांचे पती व सासरच्या लोकांविरूध्द गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयात फिर्यादी यांचे स्त्री धन हस्तगत करून देण्याकरीता, न्यायालयात जबाब नोंद करण्याकरीता तसेच आरोपीतांना कडक शासन करण्याकरीता रूपये तक्रारदार महिलेला ५,००,०००/- ची लाचेची मागणी आरोपी पोलिस अधिकारी यांनी केली व त्यातील २,२५,०००/- रुपये लोकसेवक श्रीमती स्वप्नाली मांडे, पोलीस उप निरीक्षक यांनी घेतले होते. आधीच सासरचा त्रास त्यांच्या पासून होणाऱ्या त्रासाची पोलिसांना तक्रार करून पुनः न्याय मिळण्यासाठी पुनः पैसे मोजावे लागत असतील अश्या यासर्व गोष्टीना कंटाळून महिला तक्रारदार यांनी न्यायालयात धाव घेत या सर्व आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याकरीता मा. न्यायालयात यांच्याकडे अर्ज सादर केला.

मा. न्यायालयाने सी.आर.पी.सी. कलम १५६ (३) प्रमाणे सर्व आरोपी लोकसेवक यांचेविरूध्द कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्याने दिनांक ०६/०२/२०२४ रोजी एमईसीआर. (MECR) क्र. ०४/२०२४ अन्वये श्री सुधीर कालेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अरविंद घाग, पोलीस निरीक्षक, श्रीमती स्वप्नाली मांडे, पोलीस उप निरीक्षक, सर्व तत्कालीन नेमणूक बोरीवली पोलीस ठाणे, मुंबई यांचेविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

Exit mobile version