लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा

स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेची मागणी

पुणे : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात यावे यासाठी पुणे जिल्हाधिकारी मा.सुहास दिवसे यांना स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे प्रदेशाध्यक्ष हरेशभाई  देखणे, कोषाध्यक्ष संदीप भाऊ साळुंके, रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे खेड तालुका संपर्कप्रमुख विकास शिंदे, अश्विनी साळुंखे इ. उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात भरीव काम केलेले आहे. उपेक्षित समाजाचे प्रश्न व वास्तव तत्कालीन काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी त्यांचा लेखणीच्या माध्यमातून मांडले आहेत.अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या कथा संग्रह 13 नाटके 17 पवाडे 10 प्रवासवर्णन 1 इत्यादी विपुल प्रमाणामध्ये साहित्याचे लेखन केले आहे. त्यांच्या साहित्याचे एकूण 27 भाषांमध्ये अनुवाद आहे जगाने दखल घेतलेला साहित्यिक आजही भारतामध्ये उपेक्षित का ? असा सवाल स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे प्रदेशाध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी उपस्थित केला आहे.

अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यात मानवाला महत्त्वाचे स्थान दिले. दलित, शोषित, पीडित,वंचितांचे दाहक, वास्तव जीवन आपल्या झुंजार लेखनीतून जगापुढे मांडले. प्रत्येक नायक, नायिकांना भारतीय साहित्यविश्वात अजरामर केले अशा थोर मानवतावादी, विज्ञानवादी,
पुरोगामी, सुधारक, प्रखर राष्ट्रभक्त, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारण्यात येईल असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. हरेशभाई देखणे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version