लाच मागणी पडली महागात, सरपंच व लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात.!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून निवळक ग्रामपंचायतीचे सरपंच प्रियांका अजय लामखडे, वय-३५ वर्ष, निंबळक, ता. नगर, जि.अहमदनगर व लिपीक दत्ता वसंत धावडे, वय ४० वर्ष, लिपीक, ग्रामपंचायत निवळक यांना लाच मागणी व स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. तर त्याच्याविरोधात एम.आय.डी.सी.पो.स्टे.जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, ७ अ, १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सविस्तर: तक्रारदार हे कंत्राटदार असून, त्यांनी निंबळक गावातील निंबळक –लिंगतीर्थ रस्त्याचे मजबुती करण्याचे कामाचा ठेका जिल्हा परिषद अहमदनगर कडुन मिळाला होता. त्यांनी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करुन केलेल्या कामाचे बील रु.१३,६५,०५६/- मंजुरीसाठी जिल्हा परिषद मध्ये सादर केले होते. बिल मंजूर होऊन ग्रामपंचायत निंबळक यांचे बँक खात्यामध्ये जमा झाले होते. तक्रारदार यांना रु.१२,३८,५५६/- चा चेक सरपंच व ग्रामसेवक यांचे सहीचा मिळाला होता त्यावेळी सुध्दा आरोपी लोकसेविका प्रियांका अजय लामखडे यांनी तक्रारदार यांचेकडुन पैसे घेतले होते व नंतरच चेक वर सही केली होती.

तक्रारदार यांचे बिलातील रु.१,२६,००० /- रक्कम जी.एस.टी. पोटी ग्रामपंचायत ने राखुन ठेवली होती. तक्रारदार यांनी जी.एस.टी. पुर्तता करुन १,२६,०००/- रकमेचा चेक ग्रामपंचायत निंबळक च्या ग्रामसेविका यांचेकडे मागणी केली असता, ग्रामसेविका यांनी चेक वर सही करुन चेक तयार करुन ठेवला होता, परंतु चेक वर सही करण्यासाठी यातील आरोपी लोकसेविका प्रियांका अजय लामखडे यांनी तक्रारदार यांचेकडे रु. २०,०००/- ची मागणी केली तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर येथे तक्रार दाखल केली.

तक्रारीचे अनुषंगाने निंबळक येथे लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक प्रियांका अजय लामखडे व दत्ता वसंत धावडे यांनी तक्रारदार यांचेकडे रु.२०,०००/- लाचेची मागणी करुन रक्कम आरोपी लोकसेवक लामखडे यांनी आरोपी लोकसेवक धावडे यांचेकडे देण्यास सांगितले. रक्कम मिळाले नंतरच तक्रारदार यांचे बिलाचे चेक वर सही करेन असे आरोपी लामखडे यांनी सांगितलेचे स्पष्टपणे पडताळणी मध्ये निष्पन्न झाले.

त्यावरुन निंबळक ग्रामपंचायत समोर लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक धावडे याने तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष रु.२०,०००/- लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Exit mobile version